ठाणे- महाराष्ट्र दिनाच्या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व अधिकारी देखील उपस्थित होते.
ध्वजारोहण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील 106 हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करतो, असे शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र दिनाच्या पाश्वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह सर्वजण कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वांनी घरीच थांबावे. राज्य सरकार, महापालिका आणि सर्व यंत्रणा कोरोनाशी लढत आहेत. नागरिकांनी घरी थांबून सहकार्य करावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले.
दरवर्षी महाराष्ट्र दिन जिल्हाधिकारी कार्यलयासमोर झेंडा फडकवून दादोजी स्टेडियम मध्ये दिमाखदार कार्यक्रमासह साजरा होतो. परंतु, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे या कार्यक्रमच स्वरूप बदललेले पाहायला मिळाले.