ETV Bharat / state

VIDEO: ८५ वर्षीय कीर्तनकार चिकणकर यांची बायकोला लाथाबुक्क्यांनी मारहाण, सुनांची बघ्याची भूमिका, नातवाच्या आनंदाने उड्या - ठाणे कीर्तनकार बातमी

कीर्तनकार बुआ आपल्या 80 वर्षाच्या वृद्ध बायकोला बेदम मारहाण बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला. त्यांनतर मारकुट्या कीर्तनकाराला हिललाईन पोलिसांचे पथक शोधायला त्यांच्या घरी गेले असता बुआ आळंदीला गेल्याचे त्याच्या घरच्यांनी सांगितले.

5 year old kirtankar beaten his wife in thane
85 वर्षाच्या कीर्तनकाराची बायकोला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
author img

By

Published : Jun 7, 2021, 3:52 PM IST

Updated : Jun 7, 2021, 6:23 PM IST

ठाणे - कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला कैटुंबिक आणि अद्यामिक ज्ञान देणारा 85 वर्षीय कीर्तनकार बायकोच्या जीवावर उठल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण-मलंगगड मार्गावरील द्वारली गावात घडली आहे. हा कीर्तनकार बुआ आपल्या 80 वर्षाच्या वृद्ध बायकोला बेदम मारहाण बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला. त्यांनतर मारकुट्या कीर्तनकाराला हिललाईन पोलिसांचे पथक शोधायला त्यांच्या घरी गेले असता बुआ आळंदीला गेल्याचे समजल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागले. मात्र, पोलिसांनी गजाजन बुआवर गुन्हा दाखल केला आहे. हभप गजानन बुआ चिकणकर, असे या कीतर्नकाराचे नाव आहे.

कीर्तनकाराची बायकोला मारहाण

नातवामुळे कीर्तनकारचा कैटुंबिक वाद आणला जगासमोर -

आठवड्याभरापूर्वी पाण्याच्या वादातून कीर्तनकार गजानन चिकणकर यानी बायकोशी वाद घातला होता. त्यानंतर नवरा-बायकोमध्ये बाचाबाची होऊन कीर्तनकाराच्या हातात असलेल्या बदलीनेच आपल्या बायकोला बेदम मारहाण केली. यावेळी कुटूंबातील महिला सदस्य उपस्थित असूनही या कीर्तनकारला काहीच बोलले नाही. मात्र, आपल्या आजीला आजोबा बेदम मारहाण करीत असल्याचे ८ वर्षाच्या नातवाने पहिले आणि त्याने हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करून ठेवला.

मारकुट्या कीर्तनकाराविरोधात बायकोची तक्रार नाही -

द्वारली गावातील हा मारहाणीचा व्हिडिओ देशभरात भलताच व्हायरल झाला. हा व्हिडिओ स्थानिक हिललाईन पोलिसांनी पाहिल्यावर पोलीस पथकाने गजानन बुवा चिकनकर यांचे घर गाठले. मात्र, बुआ आळंदीला गेल्याची माहिती घरच्यांनी पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे कीर्तनकार नवऱ्याने बेदम मारहाण करूनही बायकोची मात्र याप्रकरणी काही तक्रार नसल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.

कीर्तनकार बुआवर गुन्हा दाखल -

पाण्याच्या वादातून कीर्तनकार गजानन चिकणकर यांनी बायकोशी सकाळच्या सुमारास वाद घातला होता. त्यानंतर नवरा बायकोमध्ये बाचाबाची होऊन कीर्तनकाराच्या हातात असलेल्या बदलीने आणि लाथाबुक्याने बायकोला बेदम मारहाण करीत होता. हा प्रकार पाहून नातवाने आजीला आजोबा बेदम मारहाण करीत असल्याचा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करून ठेवला. मारहाणीचा हा व्हिडिओ राज्यभरात भलताच व्हायरल झाल्याने व्हिडिओ बघणाऱ्या नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. या कीर्तनकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नेटकरी होते. अखेर आज पोलिसांनी गजाजन बुआवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - बंधाऱ्यात बुडालेल्या तिघा भावंडांचे मृतदेह सापडले; सख्ख्या भावांची मिठी हृदय हेलवणारी

Last Updated : Jun 7, 2021, 6:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.