ETV Bharat / state

ठाण्यात 'इंडिया अनबाउंड'च्या संपादकाची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ - india anbound

नित्यानंद पांडे असे त्या संपादकाचे नाव आहे. ते काशीमिरा येथून प्रकाशित होणाऱ्या 'इंडिया अनबाउंड' या साप्ताहिक वृत्तपत्र व मासिक मॅक्झिनचे संपादक होते.

मृत संपादक नित्यानंद पांडे
author img

By

Published : Mar 17, 2019, 10:27 PM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील वसई रोडवरील खार्डी गावाच्या हद्दीतील नाल्यात एका संपादकाची हत्या करून मृतदेह टाकल्याची घटना घडली. नित्यानंद पांडे असे त्या संपादकाचे नाव आहे. ते काशीमिरा येथून प्रकाशित होणाऱ्या 'इंडिया अनबाउंड' या साप्ताहिक वृत्तपत्र व मासिक मॅक्झिनचे संपादक होते.

नित्यानंद पांडे हे १५ मार्चपासून बेपत्ता होते. त्याबाबत काशीमिरा पोलीस ठाण्यात शनिवारी बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. मात्र, आज सकाळी भिवंडी तालुका पोलिसांना खारबाव रोडवरील खार्डी या गावाच्या हद्दीत रस्त्यालगत एका खड्ड्यात अनोळखी मृतदेह आढळून आला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ठाणे ग्रामीण क्षेत्रातील पोलीस ठाण्यात तपास सुरु केला होता. काशीमिरा येथील बेपत्ता व्यक्तिचे वर्णन मृतदेहाशी मिळते जुळते असल्याने त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह ओळखण्यास बोलवले. त्यानंतर हा मृतदेह नित्यानंद पांडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
ही हत्या नक्की कधी झाली ? याकरता त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या मागणीनुसार मृतदेह पुन्हा शवविच्छेदनासाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील, डिवायएसपी गोडबोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी घटनास्थळी व मृतदेह ठेवलेल्या इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात भेट देऊन हत्येमागील कारणांचा तपास सुरू केला आहे.

संपादकाची निर्घुण हत्या करून नाल्यात फेकला मृतदेह; परिसरात खळबळ 

ठाणे:-एका संपादकाची निर्घुण हत्या करून त्यांचा मृतदेह भिवंडी तालुक्यातील वसईरोड वरील खार्डी गावाच्या हद्दीत एका नाल्यात आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नित्यानंद पांडे असे मृतदेह आढळून आलेल्या संपादकाचे नाव आहे. ते काशीमिरा येथुन प्रकाशित होणाऱ्या इंडिया अनबाउंड या साप्ताहिक वृत्तपत्र व  मासिक मॅक्झिनचे संपादक होते.

नित्यानंद पांडे हे शुक्रवार १५ मार्च पासुन बेपत्ता होते. त्याबाबत काशीमिरा पोलीस ठाण्यात शनिवारी बेपत्ता असल्याची खबर त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. मात्र आज सकाळच्या सुमाराला भिवंडी तालुका पोलीसांना खारबाव रोड वरील खार्डी या गावाच्या हद्दीत रस्त्यालगत एका खड्ड्यात एक अनोळखी मृतदेह हत्या करुन फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आला होता. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी  रवाना केला. या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी ठाणे ग्रामीण क्षेत्रातील पोलीस ठाण्यात तपास सुरु केला असता काशीमिरा येथील बेपत्ता व्यक्तिचे वर्णन मृतदेहाशी मिळते जुळते असल्याने त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह ओळखण्यास बोलाविले असता सदरचा मृतदेह नित्यानंद पांडे यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नित्यानंद यांची हत्या डोक्यात तीन ते चार वार करुन निर्घुणपणे केली असल्याने ती नक्की कधी झाली याकरीता त्यांच्या  नातेवाईकांनी केलेल्या मागणी नुसार  शवविच्छेदनासाठी मृतदेह मुंबई जे जे रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. नित्यानंद पांडे  यांना या परिसरात बोलावून त्यांचा खून केला की खून दुसरीकडे कडून त्यांचा मृतदेह येथे आणला गेला हे अजून स्पष्ट झाले नाही.  मात्र या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील, डिवायएसपी गोडबोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी घटनास्थळी व मृतदेह ठेवलेल्या स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात भेट देऊन हत्येमागील कारणांचा तपास सुरु केला आहे.

 फोटो ;- मृतक 

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.