ETV Bharat / state

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-लोकार्पण

मीरा-भाईंदर, वसई-विरार येथे गुन्हेगारी वाढल्याने या ठिकाणी आयुक्तालयाची स्थापना व्हावी, अशी अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी होती. आज या आयुक्तालयाचे ई-लोकार्पण करण्यात आले आहे.

ई-लोकार्पण वेळचे छायाचित्र
ई-लोकार्पण वेळचे छायाचित्र
author img

By

Published : Oct 1, 2020, 5:39 PM IST

मीरा-भाईंदर (ठाणे) - मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयचा ई-लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालघरचे पालकमंत्री दादा भुसे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्ग उपस्थित होते.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय प्रत्यक्ष कामाची सुरुवात करावी, असा आदेश काल (दि. 30 सप्टें.) महाराष्ट्र सरकारने जारी केला होता. त्यानुसार आज (दि.1 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई-लोकार्पण सोहळ्याला प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी, तसेच लोकप्रतिनिधी व नागरिकांनी ऑनलाइन हजेरी लावली होती.

मीरा-भाईंदर, वसई-विरार शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढ झाली आहे. त्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात जास्त होत आहे. यामुळेच अनेक वर्षांपासून पोलीस आयुक्तालयची मागणी होत होती. तत्कालीन भाजप सरकारने प्रशासकीय मान्यता दिली. मात्र, प्रत्यक्षात त्याची सुरुवात झाली नाही. महाविकास आघाडी सरकारने पोलीस आयुक्तालयला मान्यता देऊन तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांची मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. 9 सप्टेंबरपासून सदानंद दाते यांनी सर्व पोलीस ठाण्यात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली गुन्ह्या संदर्भात माहिती घेतली. मात्र, आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये जे घडले तसे कुठेही होता कामा नये, असा कारभार मला मीरा-भाईंदरमधून अपेक्षित आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - रबाळे रेल्वे स्थानकासमोर अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.