ETV Bharat / state

severe water shortage: उच्चभ्रु सोसायटीतही भीषण पाणी टंचाई, सात हजार सदनिका धारकांना झळ - Kalyan Sheel Marg

उच्चभ्रु सोसायटीतील सात हजार सदनिका धारकांना भीषण पाणी टंचाईची झळ पोचत असल्याचा प्रकार पहायला मिळत आहे. कल्याण शीळ मार्गावर असलेल्या सोसायटीतील रहिवासीयांनी वारंवार मागणी करूनही त्यांचा घसा कोरडाच असल्याचे पहायला मिळत आहे.

severe water shortage
भीषण पाणी टंचाईची झळ
author img

By

Published : Jun 5, 2023, 2:00 PM IST

Updated : Jun 5, 2023, 5:17 PM IST

ठाणे : कल्याण - शीळ मार्गावरील असलेल्या दावडी येथील रिजन्सी अनंतम या उच्चभ्रु सोसायटीत राहणाऱ्या सात हजार सदनिकामध्ये राहणाऱ्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या प्रकारामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी नागरिकांनी एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र त्याचा फारसा फायदा झालेला नाही. रहिवासीयांसाठी मंजूर असलेल्या कोट्या प्रमाणे पाणी मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार असून या प्रकारा बद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या भागातील त्रस्त रहिवासीयांची नुकतीच मनसे आमदार राजू पाटील यांनी भेट घेतली. तेव्हा रहिवासीयांनी त्यांच्या समोर मोठ्या प्रमाणात समस्या मांडल्या या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. या संदर्भात तातडीने एमआयडीसी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले. कल्याण डोंबिवली परिसरात दिवसेंदिवस झपाट्याने गृहसंकुलांची कामे सुरू आहेत. मात्र या बांधकामांना परवानगी देताना संबंधित यंत्रणांकडून पडताळणी केली जात नसल्याने शहरात पाणी टंचाईसह इतरही नागरी समस्या रहिवासीयांना त्रस्त करत आहेत.

त्यामुळे उच्चभ्रु गृहसंकुलांमध्ये वास्तव्यास आलेल्या हजारो नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. कल्याण ग्रामीण भागातील दावडी येथे उभारण्यात आलेल्या रिजन्सी अनंतम मधील सात हजार सदनिका धारकांना अशाच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पाण्याचा कोटा मंजूर असताना देखील सात हजार सदनिका धारकांचा घसा कोरडाच राहत आहे.

या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी संबंधित नागरिकांची भेट घेतली आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेत तातडीने केडीएमसी, एमआयडीसी आणि नागरिकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन पाणी समस्या सोडवण्याचे आश्वासन आ. राजू पाटील यांनी दिले आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, विधानसभा सचिव अरुण जांभळे,सुनील राणे,संजय चव्हाण यांसह अन्य पदाधिकारी आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा

  1. Gufi Pental passed away : महाभारतातील शकुनी मामा फेम गुफी पेंटल यांचे ७८ व्या वर्षी निधन
  2. Gopichand Padalkar Criticized Sharad Pawar: गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर सडकून टीका, म्हणाले गेल्या वर्षी चौंडी येथे मस्ती...
  3. फडणवीसांचा मक्का मदीना दिल्लीत पण, शिंदे गटाची दिल्तीत मुजरा घालून गुलामी - संजय राऊत

Last Updated : Jun 5, 2023, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.