ETV Bharat / state

ठाण्यात 'थर्टीफर्स्ट'च्या सेलिब्रेशनवर ड्रोनची नजर

थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. शिवाय या सेलिब्रेशनवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन ड्रोन कॅमेराची मदत घेणार असल्याची माहिती पोलीस परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

author img

By

Published : Dec 30, 2020, 5:10 PM IST

Drone Camera use thane
पोलीस बंदोबस्त ठाणे थर्टीफर्स्ट

ठाणे - थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. शिवाय या सेलिब्रेशनवर नजर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन ड्रोन कॅमेराची मदत घेणार असल्याची माहिती पोलीस परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

माहिती देताना परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे

हेही वाचा - ठाणेकर गारठले; किमान तापमान १६ अंशावर

केडीएमसी हद्दीत कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भव जास्त प्रमाणात झाला आहे. महाराष्ट्र सरकारने देखील नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली आणि परिमंडळ तीन परिसरात कुठेही रात्री अकरानंतर पाचपेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येऊन कोणतेही नववर्षाचे स्वागत किंवा इतर कार्यक्रम करू नये यासाठी काटेकोर नियोजन आणि बंदोबस्त लावले आहे. त्यानुसार दुर्गाडी नाका, गांधारी नाका, शहाड ब्रिज, पलावा ब्रिज, बदलापूर नाका आणि टाटा पावर हाऊस नाका या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणांवर बारकाईने सर्व वाहन चालक आणि प्रवासी यांची मद्यसेवन आणि इतर तपासणी करण्यात येणार आहे.

20 विशेष पोलीस पथकाची गस्त...

कोरोना संबंधीच्या मास्क आणि इतर बाबतची तपासणी देखील होणार असून, सोसायटीच्या आवारात किंवा टेरेसवर एकत्र येऊन सेलिब्रेशन होऊ नये यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात येणार आहे. शिवाय तळीरामांवर नजर ठेवण्यासाठी 20 विशेष पोलिसांचे पथक गस्त घालणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

हेही वाचा - विशेष : ठाणे जिल्ह्यात चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात २४ टक्के घट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.