ETV Bharat / state

Doctor Kidnapping Case : फिल्मी स्टाईलने डॉक्टरचे अपहरण; ३० लाखांची खंडणी घेऊन जंगलात पोबारा - Thane Crime

डॉक्टरचे भर रस्त्यातून फिल्मी स्टाईलने अपहरण (Doctor Kidnapping Case in filmy style) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Doctor Kidnapping Case
डॉक्टरचे अपहरण
author img

By

Published : Nov 18, 2022, 7:59 PM IST

ठाणे : स्त्रीरोग तज्ज्ञ असलेले नामांकित डॉक्टरचे भर रस्त्यातून फिल्मी स्टाईलने अपहरण (Doctor Kidnapping Case in filmy style) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी सुमारे ३० लाख रुपयांची रोकड घेऊन (Extortion of 30 lakhs recovered from doctor) डॉक्टरला जंगलात सोडून अपहरणकर्ते पळून गेल्याचा (kidnappers run away to Forest) धक्कादायक प्रकार घडला. ही घटना मुरबाड तालुक्यातील सरळगावच्या जंगलात घडली आहे. या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात चार अज्ञात अपहरणकर्त्यांवर विविध कलमानुसार गुन्हा करून (case filed against kidnapper of doctor) त्यांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. डॉ. जितेंद्र बेंढारी (वय ३८) (Dr Jitendra Bendhari Kidnapping ) असे अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. latest news from Thane, Thane Crime

डॉक्टरचा उचलून कारमध्ये कोंबले - मुरबाड बस डेपो समोर डॉ. जितेंद्र बेंढारी यांचे तन्मय नावाने हॉस्पिटल आहे. डॉ. बेंढारी हे २१ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हॉस्पिटलमधून घरी जाण्यासाठी म्हसा रोडने माऊली नगर येथील आपल्या घरी दुचाकीवरून जात होते. त्यावेळी मुरबाड शासकीय विश्रामगृहासमोर त्यांना बेंढारी सर म्हणून एका अज्ञात व्यक्तीने आवाज देत त्यांची दुचाकी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती व्यक्ती त्यांच्या परिचित नव्हती परंतु त्यांना नावाने आवाज दिल्यामुळे कोणी तरी परिचित असावा म्हणून त्यांनी दुचाकी थांबवली. आणि बोलण्यात गुंतवून ती अज्ञात व्यक्ती दुचाकीवर सजाई जायचे म्हणून डॉक्टरांच्या दुचाकीवर पाठीमागे बसली व तुम्ही जाता तिकडेच मला जायचे आहे, असे बोलू लागली. काही वेळाने डॉ. पुढे गेले तेथे एक चारचाकी वाहन अंधारात उभे होते. ते वाहन पाहताच पाठीमागील व्यक्तीने दुचाकी थांबवण्यास सांगितले असता, डॉक्टरने दुचाकी थांबवली. मात्र, तो उतरताच त्याने साथीदारांच्या मदतीने डॉ. बेंढारी यांना उचलून अंधारात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनात कोंबले. त्यानंतर त्याच्या डोक्यावर चादर टाकून त्यांचे हातपाय बांधून वाहनाच्या मागच्या बाजूला टाकून वाहन जंगलातुन पळवले.

तुम्हे किडनॅप किया है - सुमारे दोन तासाने सरळगाव परिसरातील जंगलात डॉ. यांच्या दुचाकीसह वाहन घेऊन अपहरणकर्ते पोहचले होते. खळबळजनक बाब म्हणजे सुमारे दीड ते दोन तास डॉक्टरला अपहरणकर्ते वाहनात मारहाण करत त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्यांच्या डोळ्यांवर व तोंडाला पट्टी बांधून “तुम्हे किडनॅप किया है, हमे खोके चाहिये नही, तो तुम्हारे तुकडे तुकडे करेगे” असे बोलून त्यांना धमकी दिली. मात्र सुरवातीला डॉक्टर अपहरणकर्त्यांना बोलले कि, माझ्याकडे पैसे नाही मला मारून टाका असे बोलताच अपहरणकर्ते रोकड साठी तडजोड करत १ खोका दे, माझ्याकडे एवढे पैसे नाही, मग ५० लाख दे, मात्र जिवाच्या भीतीने डॉक्टर १५ लाख देण्याची तयारी दाखवली. तर अपहरणकर्त्यानी डॉक्टरकडे ३० लाख रोकडची मागणी केली. तसेच १० लाख कितो तेरा सुपारी है. असे बोलत असतानाच डॉक्टरांच्या पत्नीचा मोबाईलवर कॉल आला. त्यावेळी डॉक्टरने पत्नीला सांगितले कि, माझे अपहरण झाले असून ३० लाख घेऊन हे अपहरणकर्ते सांगतील त्या ठिकाणी पोहोच.

अन्यथा पती जिवंत राहणार नाही - त्यानंतरही डॉ. बेंढारी यांच्या पत्नीला वारंवार अपहरकर्ते फोन करून पैशाची मागणी करत असल्याने भयभीत पत्नीने त्यांना आपल्या पतीला सोडण्याची विनंती केली. परंतु ३० लाख रुपये आम्ही सांगू त्या ठिकाणी घेऊन ये अन्यथा पती जिवंत राहणार नाही. या वेळी एखाद्या फिल्मी स्टाईलने मध्यरात्रीपर्यत चाललेला थरार आणि पतीला होणारी मारहाण डॉक्टरांच्या पत्नीला मोबाईलवर ऐकायला मिळत होता. अखेर ३० लाख रोख रक्कम पत्नीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोच केल्यानंतर अपहरकर्त्यानी पतीची सुटका झाली. मात्र सुटका करताना जर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास गेला तर तुझ्यासह तुझ्या कुटूंबाला ठार मारू अशी धमकी अपहरणकर्त्यानी डॉक्टरला दिली होती.

अपहरणाच्या गुन्ह्याची तक्रार दाखल - विशेष म्हणजे २१ ऑक्टोंबर रोजी सांयकाळी साडे तास वाजता अपहरण झाल्यानंतर २२ ऑक्टोंबर रोजी पहाटे ५ वाजता डॉ. सुखरूप घरी पोहचले होते. मात्र १० तास अपहरणकर्त्याच्या तावडीतुन सुटका होऊनही डॉक्टरसह त्याचे कुटूंब अपहरणकर्त्याच्या धमकीला घाबरून आठ दिवस घराबाहेर पडले नव्हते. अखेर नातेवाईकांसह कुटूंबाने डॉक्टरला हिंमत दिल्यानंतर २६ दिवसांनी म्हणजे १६ नोव्हेंबर रोजी मुरबाड पोलीस ठाण्यात या फिल्मी स्टाईल अपहरणाच्या गुन्ह्याची तक्रार दाखल झाली. डॉक्टरच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३६४, ३८७, ३४१, ३४२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे चार अज्ञात अपहरणकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी ठाणे ग्रामीण गुन्हे शाखा आणि मुरबाड पोलिसांचे संयुक्त पोलीस पथके तपास करीत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.