ETV Bharat / state

अंगाला हळद लागण्यापूर्वीच रस्त्यांवरील खड्ड्यांनी घेतला डॉक्टर तरुणीचा बळी

author img

By

Published : Oct 10, 2019, 5:33 PM IST

Updated : Oct 10, 2019, 5:49 PM IST

ठाण्यातील डॉक्टर तरुणीचे येत्या ८ नोव्हेंबरला लग्न होते. त्यासाठी ती खरेदी करायला गेली. मात्र, परत येताना वाटेतील रस्त्यांनी तिचा बळी घेतला.

मृत डॉ. नेहा आलमगिर शेख

ठाणे - जिल्ह्यातील भिवंडी-वाडा मार्गावरील खड्ड्यांनी डॉक्टर तरुणीचा बळी घेतल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. येत्या ८ नोव्हेंबरला तिचे लग्न होणार होते. मात्र, अंगाला हळद लागण्यापूर्वीच खड्ड्याने तिचा बळी घेतला.

अंगाला हळद लागण्यापूर्वीच रस्त्यांवरील खड्ड्यांनी घेतला डॉक्टर तरुणीचा बळी

डॉ. नेहा आलमगीर शेख (२३), असे मृत तरुणीचे नाव आहे. तिचे लग्न मुंब्रा-कौसा येथील डॉक्टर मुलाशी होणार होते. त्यासाठीच ती बुधवारी रात्रीच्या सुमारास लग्नाची खरेदी करून भावाच्या मोपेडवरून कुडूस येथील घरी जात होती. मात्र, रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये त्यांची दुचाकी आदळली. त्यामध्ये नेहा खाली पडली. तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनगाव येथील टोल नाका मध्यरात्री बंद पाडला होता. तसेच गुरुवारी नागरिकांनी रास्ता रोको करीत सुप्रीम कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Intro:kit 319Body:भिवंडी - वाडा रोडवर खड्ड्याने घेतला डॉक्टर तरुणीचा बळी .

ठाणे : भिवंडी - वाडा मार्गावरील दुगाड गावानजीक खड्डयांत दुचाकी आदळून डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रात्री अनगाव येथील टोल नाका मध्यरात्री बंद पडला आहे . पुढच्या महिन्यात तिचे लग्न होणार होते. मात्र अंगाला हळ्द लागण्यापूर्वीच खड्डयाने तिचा बळी घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉ.नेहा आलमगिर शेख (२३ ) असे मृतक डॉक्टर तरुणीचे नाव आहे.

मृतक डॉ.नेहार शेख हि ठाण्यात लग्नाची खरेदी करून भिवंडी - वाडा मार्गाने भावाच्या स्कुटी वरून कुडूस येथील घरी रात्रीच्या सुमाराला जात होती. त्याच सुमाराला दुगाड गावानजीक रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी ( स्कुटी ) आदळल्याने डॉ नेहा खाली पडल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने डॉक्टर नेहाचा जागीच मृत्यू झाला आहे. तिचे लग्न मुंब्रा-कौसा येथील डॉक्टर मुलाशी 8 नोव्हेंबर रोजी होणार होते या घटनेने आज दुघाड इथं नागरिकांनी रस्ता रोको करीत टोल वसूल करणाऱ्या .सुप्रीम कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे ..

Conclusion:bhiwandi apghat
Last Updated : Oct 10, 2019, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.