ETV Bharat / state

Crime : सासू अन् पत्नीच्या छळाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या; गुन्हा दाखल - Thane District Doctor Suicide

माहेरी गेलेली पत्नी फोन उचलत नाही या नैराश्याने डॉक्टर असलेल्या पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ( Doctor Commits Suicide ) घटना घडली होती. या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला होता. मात्र, डॉक्टरच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट मिळाल्याने त्यावरून आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या पत्नी, सासू विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा ( Crime ) दाखल करण्यात आला आहे.

कल्याण तालुका पोलीस ठाणे
कल्याण तालुका पोलीस ठाणे
author img

By

Published : Nov 29, 2021, 10:11 PM IST

ठाणे - माहेरी गेलेली पत्नी फोन उचलत नाही या नैराश्याने डॉक्टर असलेल्या पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ( Doctor Commits Suicide ) घटना घडली होती. या प्रकरणी कल्याण तालुका ग्रामीण पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला होता. मात्र, डॉक्टरच्या मोबाईलमध्ये सुसाईड नोट मिळाल्याने त्यावरून आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या पत्नी, सासू विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा (Crime ) दाखल करण्यात आला आहे. अविनाश मोहन देशमुख (वय 32 वर्षे), असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे.

ओडणीच्या साहायाने पंख्याल गळफास घेवून आत्महत्या...

पोलिसांकडून मिळालेले सविस्तर वृत्त असे की, कल्याण तालुका हद्दीतील टिटवाळा पूर्वेतील मोनम हाईट्स् पहिला माळ्यावर राहणाऱ्या व व्यवसायाने डॉक्टर असलेल्या अविनाश यांनी 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास आत्महत्या केली होती. आत्महत्येच्याअगोदर दोन महिन्यापूर्वी बाळंतपणासाठी त्यांची डॉक्टर पत्नी ही सातारा येथे गेली होती. त्यामुळे अविनाश आपल्या पत्नीस विचारपूस करण्यासाठी वांरवार मोबाईलवर संपर्क करीत होते. पण, पत्नी ही फोन उचलत करीत नसल्याच्या नैराश्यापोटी घरातील बेडरूममध्ये स्वतःच्या गळ्यात ओडणीच्या साहयाने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला.

सुसाईड नोटमुळे गुन्हा दाखल ...

डॉ. अविनाश यांच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्या संजीवनी क्लिनिकच्या लेटरवर आपली पत्नी हिचे तिच्या मामेभावाशी अनैतिक सबंध असून सासू तिला पाठाशी घालत असल्याची नोट मिळल्याने कल्याण पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्या केलेल्या डॉ. अविनाश यांची पत्नी, सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी दिली आहे.

हे ही वाचा - Rape on Minor Girl : कारागृहात बंद असलेल्या आईला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.