ठाणे : खारेगाव रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाला मंजुरी मिळवून देण्यासाठी शरद पवार (Former Union Agriculture Minister Sharad Pawar ) यांनी प्रयत्न केले. त्यांनी तत्कालीन खासदार आनंद परांजपे आणि तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर पुलाच्या निर्माणासाठी तत्कालीन तीन आयुक्तांकडून निधी मिळवला. खारेगाव उड्डाणपूल, कळवा खाडीवरील पूल आणि तिसऱ्या पुलासाठी आमची मेहनत असल्याचे गृहनिर्माण डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे ठाणे महापौरांनी मात्र या पुलाच्या निर्माणासाठी निधी पालिकेने दिल्याने या निर्माणच्या श्रेयावर दावा केला आहे. त्यामुळे ठाण्यात आता राजकारण सुरु झाले आहे. या पुलांचे उदघाटन करणार कोण? राष्ट्रवादीचे जयंत पाटील की पालकमंत्री एकनाथ शिंदे हा नवा वाद विकोपाला गेला आहे.
उद्घाटनाचा वाद ठाण्यात उफाळला
खारेगाव उड्डाणपुलाची पाहणी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Dr. Jitendra Awhad ) यांनी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते. या पुलाच्या निर्माणासाठी राष्ट्रवादीने मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे या पुलाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते व्हावे, अशी अपेक्षा जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. दरम्यान शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे ( Shiv Sena MP Shrikant Shinde ) आणि महापौर नरेश म्हस्के यांनी नकार दिला. तसेच पुलाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे ( Guardian Minister Eknath Shinde ) यांच्या हस्ते करण्याचे वक्तव्य केले. त्यामुळे आता खारेगाव उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा वाद ठाण्यात उफाळला ( controversy erupted in Thane ) आहे. या पुलाच्या निर्माणासाठी निधी कुणी दिला. पुलाच्या निर्माणासाठी पाठपुरावा कुणी केला. याबाबत आता वाद सुरु झालेला आहे. उड्डाणपुलाच्या पाहाणीनंतर श्रेयवादानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने-सामने उभे ( Shiv Sena and NCP face to face for credit ) टाकलेले आहेत.
आव्हाडांना घेरण्यासाठी मिशन कळवा -
कळव्यात शिवसेनेचे "मिशन कळवा" ( Mission Kalawa ) डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उड्डाणपुलाच्या पहाणी नंतर पुलाच्या निर्माणाचा श्रेयवाद निर्माण झाला. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसले. आता शिवसेनेने "कळवा मिशन" ची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे कळव्यात सर्वच नगरसेवक हे शिवसेनेचे असावे यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आदेश खासदार आणि महापौर यांनी दिले आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत कळव्यातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्याची रणनीती शिवसेनेने आखल्याची शक्यता आहे. कामांच्या श्रेयाची लढाई सुरू झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. मी 2009 साली आमदार झाल्यानंतर कळवा खारेगाव भागात किती बदल झाला आहे, हे नागरिकांना माहिती असल्याचे आव्हाड यांनी श्रेयवादावर बोलताना सांगितले आहे.