ETV Bharat / state

'आता तरी मंत्रीमंडळ विस्तार करा'; फडणवीसांची बदलापूरमधून टोलेबाजी

विरोधाभासातून एकत्र येत सत्ता मिळवली आहे, तर सरकार व्यवस्थित  चालवा, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'अटलसंध्या' कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

author img

By

Published : Dec 26, 2019, 7:48 PM IST

devendra fadanvis speaks about mahavikas aghadi
'आता तरी मंत्रिमंडळ विस्तार करा'; फडणवीसांची बदलापूरमधून टोलेबाजी

ठाणे - विरोधाभासातून एकत्र येत सत्ता मिळवली आहे, तर सरकार व्यवस्थित चालवा, असा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'अटलसंध्या' कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर टीका केली. यावेळी, 'आता सत्तेत आला आहात; तर किमान मंत्रीमंडळाचा विस्तार करा,' असा टोमणा त्यांनी लगावला.

'आता तरी मंत्रीमंडळ विस्तार करा'; फडणवीसांची बदलापूरमधून टोलेबाजी

आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात रंगलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून बोलताना, राज्य तुमच्या हाती असून त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा : 'गेल्या ५ वर्षात शेतकऱ्यांना ५३ हजार कोटींची मदत'

विरोधाभासातून एकत्र येत या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ता स्थापन केल्याने हे सरकार चालवण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्र्यांनाच कसरत करावी लागणार आहे, असे ते म्हणाले. राज्याच्या इतिहासात कधीही मंत्रिमंडळ विस्ताराला एवढा वेळ लागला नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आता तरी मंत्रिमंडळाचा विस्तार करा, आणि राज्य चालवा, असा खोचक टोला त्यांनी यावेळी दिला. संबंधित कार्यक्रमात भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे उपस्थित होते.

Intro:kit 319Body:किमान मंत्रीमंडळ विस्तार आता तरी करा ..फडणवीसांचा महाविकास आघाडीला टोमणा

-ठाणे : विरोधाभासातून एकत्र येत सत्ता मिळवली आहे, तर सरकार व्यवस्थित तरी चालवा. किमान मंत्री मंडळाचा विस्तार तरी करा, असा टोमणा विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मारला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटलसंध्या कार्यक्रमासाठी फडणवीस बदलापुरात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त बदलापुरात अटल संध्या या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात रंगलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्य तुमच्या हाती असून त्याच्या संरक्षणासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केले.
तसेच विरोधाभासातून एकत्र येत या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आहे, त्यामुळे हे सरकार चालवण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांना कसरत करावी लागणार आहे. राज्याच्या इतिहासात कधीही इतका वेळ मंत्रीमंडळ विस्तारासाठी लागला नव्हता. किमान आता तरी मंत्री मंडळाचा विस्तार करा आणि राज्य चालवा असा खोचक सल्ला त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे उपस्थित होते.

Conclusion:bdalapur
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.