ETV Bharat / state

डंपरच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू - ठाणे जिल्हा लेटेस्ट न्यूज

क्रिकेट खेळताना आपल्याकडे टोलावलेला चेंडू उचलत असताना, अमित जगदीश धाकड या 12 वर्षीय चिमुरड्याला कचरावाहू डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे खाली कोसळलेल्या अमितच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याण जवळच्या कचोरे येथील गावदेवी मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी बेजबाबदार डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.

डंपरच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू
डंपरच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू
author img

By

Published : May 23, 2021, 6:43 PM IST

ठाणे - क्रिकेट खेळताना आपल्याकडे टोलावलेला चेंडू उचलत असताना, अमित जगदीश धाकड या 12 वर्षीय चिमुरड्याला कचरावाहू डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे खाली कोसळलेल्या अमितच्या अंगावरून डंपरचे चाक गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याण जवळच्या कचोरे येथील गावदेवी मंदिर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी बेजबाबदार डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.

ठाकुर्ली-कल्याण रेल्वे समांतर रस्त्यावर असलेल्या कचोरे गावदेवी मंदिर परिसरात उर्मिला धाकड या आपल्या चार मुलांसह राहातात. पतीचे 5 वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर, मोठा मुलगा रोहन याच्याबरोबर काबाडकष्ट करत त्या आपल्या मुलांचा सांभाळ करतात. त्यांचा धाकटा 12 वर्षांचा मुलगा अमित शनिवारी मित्रासमवेत गावदेवी मंदिर परिसरात क्रिकेट खेळत होता. खेळता खेळता मित्राने टोलावलेला चेंडू त्याच्या हातात येण्याऐवजी रस्त्याच्या कडेला गेला. हा चेंडू उचलण्यासाठी अमित वाकला होता. इतक्यात कचऱ्याचा ढिगारा उचलण्यासाठी आलेला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचा डंपर रिव्हर्स येत होता. मागे काही नाही याची खातरजमा न करताच चालकाने डंपर वेगाने रिव्हर्स घेतला. त्यामुळे या डंपरची जोरदार धडक बसल्याने अमित खाली पडला. मात्र तरीही त्याची कल्पना चालकाला नसल्याने अमित डंपरच्या चाकाखाली गेला. हा प्रकार पाहून आसपासच्या रहिवाश्यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. चालकाने अमितला रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे अमितची प्राणज्योत मालवली होती. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.अमितच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरिली आहे.

पोलिसांकडून डंपर जप्त

या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी बेजबाबदार डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून, त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच (एम. एच.05 एन. 0197) क्रमांक असलेला संबंधित डंपर देखील पोलिसांनी जप्त केला आहे. या वाहनचालकाविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अमितच्या नातेवाईकांनी केली आहे. अमित हा पत्रिपुलाजवळ असलेल्या श्रीकृष्ण नगरातील सर्वोदय शिक्षण प्रचार मंडळाच्या हिंदी विद्यालयात सहाव्या इयत्तेत शिकत होता. अमितच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या मित्रांनाही अश्रू अनावर झाले आहेत.

हेही वाचा - ऑक्सिजन वापराबद्दल आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्वे; रुग्णालयांनी दुर्लक्ष केल्यास होणार कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.