ठाणे: येऊरच्या जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या मादी बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे. महाराष्ट्रातील ठाणे शहरातील येऊरच्या जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या एका मादी बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमुद करण्यात आले आहे, अशी माहिती उद्यानातील अधिकाऱ्यांनी दिली.
मादी बिबट्याचा मृतदेह: ठाणे येथील येऊर परिसरात लोकमान्य नगर वसाहतीच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. वन्य कर्मचारी २५ नोव्हेंबर रोजी गस्तीवर असताना त्यांना लोकमान्य नगर वसाहतीपासून दोन किमी अंतरावर वन हद्दीमध्ये मादी बिबट्याचा मृतदेह आढळला. एक-दोन दिवस आधीच बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बिबट्याचा मृत्यू झाल्याचे उघड: या घटनेची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. बिबट्याचा मृतदेह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे बिबट्याचा मृत्यू झाल्याचे उघड आहे, अशी माहिती उद्यानातील अधिकाऱ्यांनी दिली.