ETV Bharat / state

कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी कल्याण ते हैदराबादपर्यंत सायकने प्रवास - Kalyan Corona Latest News

संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर निरोगी शरीर आणि आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासह, जनजागृती करण्यासाठी कल्याणातील जागरूक व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कल्याण ते हैदराबाद असा तब्बल 730 किलोमीटरचा प्रवास सायकलद्वारे करण्यात येणार आहे.

Cycling for public awareness
कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी कल्याण ते हैदराबादपर्यंत सायकने प्रवास
author img

By

Published : Dec 12, 2020, 4:46 PM IST

ठाणे - संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर निरोगी शरीर आणि आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासह, जनजागृती करण्यासाठी कल्याणातील जागरूक व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कल्याण ते हैदराबाद असा तब्बल 730 किलोमीटरचा प्रवास सायकलद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये नामांकित डॉक्टर, वकील, ऑफिसर, प्रोफेसर आणि उद्योजकांचा समावेश आहे. या सामाजिक उपक्रमाला 'इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण'नेही पाठिंबा दिला आहे.

कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी कल्याण ते हैदराबादपर्यंत सायकने प्रवास

कोरोनाविरोधात जनजागृतीसाठी कल्याण ते हैदराबाद प्रवास

मार्च महिन्यामध्ये भारतासह संपूर्ण जगात शिरकाव केलेल्या कोरोनाने सर्वांचेच आयुष्य बदलून टाकले आहे. चांगले आरोग्य आणि योग्य जीवनशैली असल्यास कोरोनावर निश्चितच मात करता येते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. नेमका हाच धागा पकडत कल्याणामधील नागरिक एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी एकत्र येऊन कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी कल्याण ते हैदराबाद असा सायकल प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सायकलपटू डॉ. रेहनुमा, बाईकपोर्ट सायकलचे साहिर शेख, बालरोगतज्ज्ञ डॉ. अनंत इटकर, ऍड. चंद्रभान साबळे, प्रोफेसर आनंद जाधव, रेल्वेचे अधिकारी गिरीश राव, भारतीय नौसेनेतील रमेश पलाटी, सुधाकर वर्मा आणि हॉटेल व्यावसायिक किरण शेट्टी यांचा सहभाग आहे. सायकलिंग हा आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय असून, त्याचे महत्त्व पटवण्यासाठी आणि कोविडयोद्ध्यांच्या सन्मानासाठी आम्ही हा उपक्रम राबविल्याची माहिती डॉ. रेहनुमा यांनी दिली आहे.

5 दिवसांंचा सायकल प्रवास

पुढील 5 दिवसांत म्हणजेच 16 डिसेंबरपर्यंत कल्याण ते हैदराबाद असा प्रवास करत हे सायकलपटू आरोग्याबाबत जनजागृती करणार आहेत. दरम्यान या सामाजिक उपक्रमाला इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणनेही पाठिंबा दर्शवत या जागरूक नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. आरोग्याबाबत लोकांमध्ये अधिकाधिक जागरूकता येणे ही काळाची गरज असून, त्यासाठी या लोकांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.