ETV Bharat / state

Officer Commits Suicide : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याची तळ्यात उडी मारुन आत्महत्या - वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळू सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची घटना तळोजा कारागृहाजवळील तलावात उघडकीस आली. याप्रकणरी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मयांक सिंग असं तलावात आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे.

Officer Commits Suicide
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 2:29 PM IST

नवी मुंबई : खारघर येथील तळोजा कारागृहासमोरील तलावात उडी मारून सीमा शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं आत्महत्या केली. मयांक सिंग असं तलावात आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा एकीकडं सुरू असतानाच दुसरीकडं सीबीआयमध्ये गुन्हा दाखल होण्याच्या भीतीतून ही आत्महत्या केल्याची चर्चा सुरु आहे. याप्रकरणी खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत.

तलावात आढळला मृतदेह : नवी मुंबई परिसरात असणाऱ्या खारघर येथील तळोजा कारागृहाच्या समोरच्या तलावात 42 वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह आला होता. ही घटना 25 ऑगस्टला सकाळी 10 ते 10.30 सुमारास येथील काही नागरिकांमुळे उघडकीस आली. पोलिसांनी केलेल्या तपासात आत्महत्या केलेला अज्ञात तरुण हा सीमा शुल्क विभागातील मयांक सिंग हा अधिकारी असल्याची माहिती मिळाली होती. मयांक सिंग हे उरण परिसरातील न्हावा शेवा याठिकाणी कार्यरत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी : तळोजा कारागृहासमोरील तलावात आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव मयांक सिंग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मयांक यांनी त्यांची कार तळोजा तलावाशेजारी पार्क करून त्या गाडीत चिठ्ठी लिहुन ठेवली होती. ही चिठ्ठी खारघर पोलिसांना मयांक यांच्या कारमधून सापडली असून या चिठ्ठीत मयांक सिंग यांनी आपल्या वरिष्ठांवर गंभीर आरोप केले आहेत.

सीबीआयमध्ये भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंद होण्याची भीती : सीमाशुल्क विभागाचे अधिकारी मयांक सिंग यांच्या घरी सीबीआयनं 24 ऑगस्टला छापेमारी केली होती. मयांक सिंग यांच्याविरोधात सीबीआयमध्ये भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल होणार असल्याची बीती त्यांना असावी अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सीमाशुल्क विभागाकडं प्रलंबित असणारी काही बिलं क्लियर करण्यासाठी मयांक सिंग यांनी पैसे घेतल्याचा आरोप मयांकवर होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआय मयांक सिंग यांच्या खारघर परिसरात असणाऱ्या घरी गेले होते. 24 ऑगस्टला सीबीआयनं त्यांच्या घरी छापेमारी केली. त्यानंतर 25 ऑगस्टला मयांक सिंग यांनी तळोजा कारागृहासमोर असणाऱ्या तलावात उडी मारून आत्महत्या केली. सीबीआय चौकशीला कंटाळून ही आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात येत आहे.

तपासाअंती गुन्हा नोंद करण्यात येईल : सीमा शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयांक यांनी केलेल्या आत्महत्येचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस यमगर करीत आहेत. याबाबत अधिक तपास सुरु असून मृतदेह सिंग कुटुंबियांना देण्यात आल्याची माहिती यमगर यांनी दिली. लवकरच कुटुंबियांना बोलावून याबाबत अधिक तपास केला जाईल, असे यमगर यांनी सांगितलं. अजून कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. सर्व चौकशी अंती तपास करून गुन्हा नोंद करण्यात येईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

हेही वाचा -

  1. Youth Suicide : ऑनलाइन गेममध्ये 50 हजार रुपये हरला, तरुणाने संपवले आयुष्य
  2. पुण्यात पोलीस ठाण्यामागेच तलावात उडी घेऊन दाम्पत्याची आत्महत्या
  3. Brother Sister Drown in Lake: कुत्र्याला तलावात आंघोळ घालायला गेले अन् स्वत:च बुडाले; बहीण-भावाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.