ETV Bharat / state

डोंबिवलीत पीएमसी बँकेच्या शाखेसमोर मोठ्या संख्येने ग्राहकांची गर्दी - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बातमी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबई स्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून पीएमसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. तर, एकावेळी हजार रुपयेच मिळत असल्याने डोंबिवलीतील ग्राहकांनी पीएमसी बँकेच्या निळजे शाखेसमोर गर्दी केली होती.

पीएमसी बँक
author img

By

Published : Sep 24, 2019, 7:54 PM IST

ठाणे - पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले आहेत. बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आलॆ आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून पीएमसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. तसेच बँकेचे ऑनलाइन व्यवहारही बंद आहेत. तर, एकावेळी हजार रुपयेच मिळत असल्याने डोंबिवलीतील वैतागलेल्या ग्राहकांनी पीएमसी बँकेच्या निळजे शाखेसमोर गर्दी केली आणि एकच गोंधळ उडाला.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबई स्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यानुसार बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तर खातेदार केवळ १ हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतील. मंगळवारी सकाळी बँकेमार्फत ग्राहकांना याची माहिती देण्यात आली. त्यामुळे चिंतीत झालेले ग्राहक बँकेत मोठ्या संख्येने जमले असून, त्यांचे कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू आहेत. डोंबिवलीतल्या लोढा हेवन परिसरात पंजाब महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. निळजे गावासह आजूबाजूची खेडी आणि लोढा हेवन, कसा रिओ, पलावा यासारख्या उच्चभ्रू वसाहतीतील ग्राहक इथल्या शाखेशी जोडली आहेत. त्यामुळे खेड्यातील नागरिकांनी त्यांची आयुष्यभराची कमाई तसेच पलावा सारख्या वसाहतीतील नागरिकांनी मोठ मोठ्या रकमेची ठेवी गुंतवणूक म्हणून ठेवली असल्याने चिंतेत असलेल्या ग्राहकांची बँकेत गर्दी होत आहे. मात्र, या शाखेतून एका वेळी हजार रुपये देण्यात येत असल्याने ग्राहकांची पंचाईत झाली आहे.

पीएमसी बँकेत ग्राहकांची गर्दी

हेही वाचा - ठाण्यात स्पोर्ट्स बाईक चोर पोलिसांच्या ताब्यात, एक साथीदार फरार
माझ्या आई-वडिलांनी माझ्या शिक्षणाच्या खर्चासाठी थोडी थोडी बचत करून पंजाब महाराष्ट्र बँकेच्या निळजे शाखेत पैसे जमा करून ठेवले होते. परंतु दिवसाला फक्त 1000 रुपयेच मिळत असल्याने आमचे पैसे अडकून पडल्याचे अनिकेत मोरे या तरुणाने सांगितले. त्यामुळे सकाळपासूनच वैतागलेल्या ग्राहकांनी आता निळजे शाखेसमोर धडक मारून संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा - 'शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा बोलबाला'

Intro:kit 319Body:डोंबिवलीत पीएमसी बँकेच्या शाखेसमोर हजारो ग्राहकांची धडक

ठाणे :- पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आलॆ आहेत. त्यामुळे आज सकाळपासून पीएमसी बँकेच्या सर्व शाखांमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. तसेर बँकेचे ऑनलाइन व्यवहारही बंद आहेत. दिवसाला हजार रुपये मिळत असल्याने डोंबिवलीतील वैतागलेल्या ग्राहकांनी पीएमसी बँकेच्या निळजे शाखेसमोर गर्दी केली आणि एकच गोंधळ उडाला.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यानुसार बँकेला नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तर खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतील. आज सकाळी बँकेमार्फत ग्राहकांना याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे चिंतीत झालेले ग्राहक बँकेत मोठ्या संख्येने जमले असून, त्यांचे कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू आहेत. डोंबिवलीतल्या लोढा हेवन परिसरात पंजाब महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. निळजे गावासह आजूबाजूची खेडी आणि लोढा हेवन, कसा रिओ, पलावा यासारख्या उचभ्रू वसाहतीतील ग्राहक इथल्या शाखेशी जोडली आहेत. त्यामुळे खेड्यातील नागरीकांनी त्यांची आयुष्यभराची पुंजी तर पलावा सारख्या वसाहतीतील नागरिकांनी मोठ मोठ्या रकमेची ठेवी गुंतवणूक म्हणून ठेवल्या आहेत. त्यामुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांची बँकेत गर्दी होत आहे. परंतु या शाखेतून एका वेळी हजार रुपये देण्यात येत असल्याने ग्राहकांची पंचाईत झाली आहे.

माझ्या आई-वडीलांनी माझ्या शिक्षणाच्या खर्चासाठी थोडी थोडी बचत करून पंजाब महाराष्ट्र बँकेच्या निळजे शाखेत पैसे जमा करून ठेवले होते. परंतु दिवसाला फक्त 1000 रुपयेच मिळत असल्याने आमचे पैसे अडकून पडल्याचं अनिकेत मोरे या तरुणाने सांगितलं. त्यामुळे सकाळपासूनच वैतागलेल्या ग्राहकांनी आता निळजे शाखेसमोर धडक मारून संताप व्यक्त केलाय.

सोबत एडिटेड पॅकेज जोडला आहे

Conclusion:dombiwali
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.