ETV Bharat / state

criminal caught in police custody : दोन हत्या करून फरार झालेला सराईत गुन्हेगार कार चोरीच्या गुन्ह्यात सापडला - कार चोरी प्रकरण

कार चोरी (car theft case) करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला कल्याण ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने टिटवाळ्यात सापळा रचून बेड्या ठोकण्यात (criminal caught in police custody) यश आले आहे. सोनुसिंग जगदिशसिंग ऊर्फ सुरजीतसिंग बावरी (वय २४ ) असे बेड्या ठोकलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. Latest news from Thane, Thane Crime

criminal caught in police custody
सराईत गुन्हेगार कार चोरीच्या गुन्ह्यात अटक
author img

By

Published : Nov 23, 2022, 7:39 PM IST

ठाणे : टिटवाळा भागातून कार चोरी (car theft case) करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला कल्याण ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने टिटवाळ्यात सापळा रचून बेड्या ठोकण्यात (criminal caught in police custody) यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा गुन्हेगार पालघर आणि जळगाव जिल्ह्यात दोन हत्या आणि एकाची हत्या करण्याचा प्रयत्न करून फरार (Absconded with attempted murder) असल्याचे पोलीस तपासत समोर आले. सोनुसिंग जगदिशसिंग ऊर्फ सुरजीतसिंग बावरी (वय २४ ) असे बेड्या ठोकलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. हा गुन्हेगार टिटवाळा भागातच एका चाळीत राहत असून तो मूळचा जळगाव जिल्ह्याचा रहिवाशी असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. Latest news from Thane, Thane Crime

कार चोरीचा गुन्हा दाखल : टिटवाळा भागातील इंदिरानगर मधून १० नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास इको कार क्रमांक MH 02 BR 5840 अज्ञात आरोपीने चोरुन नेली. त्याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात कार चोरीचा गुन्हा कार मालकाने दाखल केला. या गुन्ह्याचे अनुषंगाने उप विभागीय पोलीस अधिकारी राम भालसिंग आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकुर यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे कल्याण तालुका पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक चोरीस गेलेली इको कार व अज्ञात आरोपीचा शोध घेत होते.

सीसीटिव्हीच्या आधारे चोर गवसला : तपास सुरु असतानाच गुन्ह्याचे ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता इको कार चोरी करण्यासाठी आलेले चोरटे एक मारुती कंपनीची ए स्टार मॉडेलची सफेद रंगाची कारमधून येऊन इको कार सोबत जातांना दिसून आले. सदर कारचे संपूर्ण टिटवाळा शहर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामध्ये चोरटे ज्यामधून आले होते. त्या कारचा क्रमांक MH 06 AW 8581 असा असल्याचे दिसून आला. त्याअनुशंगाने कार मालकाचा शोध घेऊन त्यांचेकडून कार कुंदनसिंग ऊर्फ कुलदिपसिंग (रा. पालघर) यास विक्री केली असल्याची माहीती पोलीस पथकाला मिळाली. शिवाय चोरीला गेलेल्या कारचा शोध घेत असताना कार चालविणारा कुंदनसिंगचा मेहुणा गुन्हेगार सोनुसिंग हा गणेशवाडी टिटवाळा परिसरात राहण्यास असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.

फिल्मी स्टाईलने पाठलाग: या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने गणेशवाडी परिसरात सापळा लावला होता. त्यावेळी गुन्हेगार सोनुसिंग हा एका भुर्जी पाव खाण्यासाठी हातगाडीवर उभा असल्याचे पोलीस पथकाला दिसले. तर पोलीस आपल्या मागावर असल्याचे पाहून पळून जात असताना त्याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून शिताफीने पकडले. पोलीस पथकाने ताब्यात घेऊन सोनुसिंग याची कसून चौकशी केली असता त्याने साथिदारासह कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून एक इको कार, दोन मोटार सायकली चोरी केले असल्याचे निष्पण झाले. त्यानंतर त्याच्याकडून एक कार आणि दोन मोटरसायकली जप्त केल्या.

डझनभर गंभीर गुन्ह्यांची माहिती : विरार पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३०७, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे तसेच जळगाव मधील एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यातही भादंवि कलम ३०२, ३०७, ३२६, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे दाखल असून तो दोन हत्याच्या गुन्ह्यात फरार असल्याचे पोलीस तपासात समोर आले. शिवाय गंभीर मारहाण आणि वाहन चोरीचे एकूण डझनभर गुन्हे केल्याचे पोलीस तपासात निष्पण झाले. केवळ २४ वर्षाच्या सराईत गुन्हेगाराने अशाच प्रकारचे डझनभर गंभीर गुन्हे केल्याची माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. या सराईत गुन्हेगारावर आणखी काही गुन्हे केल्याची उकल होणार असून त्याला शिताफीने पकडण्याची उल्लेखनीय कामगिरी गुन्हे प्रकटीकरन शाखेचे सहा.पो.निरी.संदिप शिंगटे, पो. हवा. दर्शन सावके, पो.ना. राहुल बागुल, नंदलाल परदेशी, पो.शि. योगेश वाघेरे, धनंजय गुजर यांनी केली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.