ETV Bharat / state

कोरोना योद्ध्याची कोरोनापासून मुक्तता; वाचा संपूर्ण अनुभव त्यांच्याच शब्दांत - ठाणे कोरोना बातमी

काही दिवसापूर्वी कर्तव्य बजावत असताना या पोलीस उपनिरीक्षकाला कोरोनोची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. कालच त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

thane police
कोरोनायोद्धे
author img

By

Published : May 26, 2020, 6:53 PM IST

ठाणे - कोरोना आजार हा एचआयव्हीसारखा नाही. त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून समाजाने माणुसकी धर्म जपला पाहिजे, असे मत कोरोनाला हरवून परतलेल्या एका पोलीस उपनिरीक्षिकाचे आहेत. ते शहापूर तालुक्यातील वाशिंदचे रहिवाशी असून सध्या ते मुलूंड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर वेदांत रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांना आलेले अनुभव त्यांनी समाज माध्यमावर लिहिले आहेत.

काही दिवसापूर्वी कर्तव्य बजावत असताना या पोलीस उपनिरीक्षकाला कोरोनोची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर ठाण्यातील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. कालच त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. मात्र, कोरोनाची लागण झालेल्या या पोलीस उपनिरीक्षकाला उपचारादरम्यान अनुभव आले. हे अनुभव त्यांनी गावातील नातेवाईक आणि मित्रांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले. त्या पोस्टमध्ये सर्वात आधी रुग्णालयात असताना गावाचे पोलीस पाटील रामदास राव यांनी माझ्या कुटुंबाला रोज लागणाऱ्या दुधापासून ते इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करून चांगल्याप्रकारे सेवा केली. त्यांचे आभार मानले आहेत. तसेच गावातील हितचिंतक व प्रशासन यांचे सुद्धा आभार मानले.

समाज माध्यमावर मांडले अनुभव -

मला कोरोना झाल्याने त्यासोबत कसे लढायचे हे शिकविले. तसेच कोरोनाने मला ध्यान-साधना (विपश्यना ) करायला व पुस्तके वाचायला पुष्कळ वेळ दिला. आणि समाज्यातील स्वार्थी, निस्वार्थी, ज्ञानी, अज्ञानी व्यक्तींची जाणीव करून दिली. एकांत वासातील जीवन जगण्यास शिकविले म्हणून कोरोना विषाणूचेही त्यांनी मनपूर्वक आभार मानले . पुढे त्यांनी कोरोना विषाणूशी कसे लढायचे हेही सांगितले. माझ्यावर नामांकित चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असताना मला फक्त मल्टी व्हिटॅमिन गोळ्या, गरम पाणी, काढा, हळद मिश्रित दुध एवढेच उपचार दिले आणि त्यातच मी बरा झालो. मला आपणास एवढेच सांगणे आहे, की आपण सर्वांनी स्वतः पॉझिटिव्ह आहोत असे गृहीत धरून रोज गरम पाणी, काढा, हळद मिश्रित दूध पिण्याची सवय लावा. तसेच अंडी आणि उत्तम आहाराचे सेवन करून योग व्यायाम करा. आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

लॉकडाऊन उठल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला कामानिमित्त घराबाहेर पडायचे आहे. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तसेच येणाऱ्या पावसाळ्यात होणारे आजार हे मलेरिया, डेंग्यू की कोरोनो यापैकी कशामुळे होणार आहे, याचे निदान समजणे कठीण आहे. त्यामुळे जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनो विषाणूचा प्रादुर्भाव किमान 1 वर्ष तरी संपणार नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे अतंत्य गरजेचे असल्याचा सल्लाही त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट मधून दिला आहे.

विशेष म्हणजे कोरोनोमुळे माणूस मरतो ही भीती सर्व प्रथम डोक्यातून काढून टाका. त्याच्याबरोबर जगायला आणि त्याला तोंड द्यायला शिका. आपल्या गावात किती लोक मृत पावले आणि कोरोना आल्यापासून किती लोक मृत झाले याचा सुद्धा विचार करण गरजेचे आहे. त्यामुळे मित्रांनो कोरोनोला न घाबरता सुरक्षित अंतर ठेवून शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे पालन करा. तसेच स्वतः ची योग्य ती काळजी घेत कोरोनोविषयी असलेली भीती मनातून काढून टाका आणि न घाबरता त्यावर मात करा.

मी माझ्या अनेक सहकाऱ्यांना, मित्रांना ज्यांना कोरोनाची काही लक्षणे होती अशांना मार्गदर्शन केले. तेव्हा ते घरगुती उपचार करून घरीच बरे झाले. मी आपणास सांगू इच्छितो, की आपणास कोणाला कोरोनोची लक्षणे दिसून आली आणि तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलातरी आपण घरच्या घरीच उपचार करून सुद्धा बरे होऊ शकता. हा माझा व माझ्या अनेक कोरोनाबाधित मित्रांचा अनुभव आहे. आपणास काहीही अडचण असल्यास निसंकोचपणे कधीही कॉल करा माझ्यापरीने जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचे मी प्रयत्न करेन. कारण कोरोना विषाणूची लागण एचआयव्हीसारखी नाही. त्यामुळे त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. माणुसकी जपा काळजी घ्या, सुरक्षित रहा अशी भावना त्यांनी शेवटी मांडली आहे.

दरम्यान, काल दुपारी त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते यापुढील १४ दिवस घरीच विलगीकरणात राहणार आहेत. त्यांनतर ते पुन्हा मुलुंड पोलीस ठाण्यात रुजू होणार आहे. अशा जांबाज पोलीस अधिकाऱ्याचा अनुभव व व्यथा समाजाच्या भल्यासाठी व कोरोनावर मात करण्यासारखे असल्याचे पाहून, कोरोनायोद्ध्याला 'ईटीव्ही भारत'चा सलाम.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.