ETV Bharat / state

नवी मुंबईत कोरोनाचे थैमान सुरूच... आज नवे 47 बाधित रुग्ण

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत 406 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 4 हजार 702 लोकांची कोविड-19 ची चाचणी करण्यात आली आहे.

author img

By

Published : May 5, 2020, 9:54 PM IST

covid 19 patient increased in navi mumbai
नवी मुंबईत कोरोनाचे थैमान सुरूच...395 चा आकडा ओलांडला

नवी मुंबई - शहरामध्ये कोरोनाचा कहर वाढत असून, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आजही नवी मुंबईत 47 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत आजचा आकडा हा सर्वाधिक आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. अत्यावश्यक सेवेत आणि एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र नवी मुंबईत असून यामुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत 406 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 4 हजार 702 लोकांची कोविड-19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 3 हजार 228 जण निगेटिव्ह आले असून, 1126 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 395 इतकी आहे.

आज 325 जणांचे कोरोनाचे अहवाल प्राप्त झाले होते त्यापैकी 278 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, 47 जण आज कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आज तुर्भेमधील 5, कोपरखैरणे मधील 7, नेरुळ मधील 19 व वाशीतील 2, घणसोलीमधील 8 ऐरोलीमधील 4 आणि दिघ्यात 2 असे एकूण 47 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये एपीएमसीमधील थेट आणि संबंधित, असे आज नऊ रुग्ण आढळले असून, एपीएमसी मधील थेट आणि संबंधित रुग्णांचा आकडा 83 वर पोहोचला आहे.

आतापर्यंत शहरात कोरोनामुळे 7 जणांचे मृत्यू झाले असून, 49 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नवी मुंबईत 91 प्रतिबंधित क्षेत्र म्हणून, घोषित करण्यात आली आहेत. शहरात 395 इतका कोरोनाबाधीत रूग्णांचा आकडा झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.