ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीचा लॉकडाऊन वाढवला; २४ तासात ६०६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद - KDMC extends lockdown news

कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा कहर सुरू असून मागील २४ तासात ६०६ नवे रुग्ण आढळून आले. या संख्येसह महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णसंख्या ११ हजार ५४६ वर पोहोचली आहे.

Covid-19: KDMC extends lockdown in Kalyan-Dombivli till July 19
कल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊनचा वाढला; २४ तासात ६०६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
author img

By

Published : Jul 11, 2020, 7:57 AM IST

Updated : Jul 11, 2020, 8:41 AM IST

ठाणे - कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा कहर सुरू असून मागील २४ तासात ६०६ नवे रुग्ण आढळून आले. या संख्येसह महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णसंख्या ११ हजार ५४६ वर पोहोचली आहे. तर रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्याने रुग्णांवर उपचार करायचे कुठे? हा प्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. अशात महापालिका आयुक्तांनी १२ जुलैपर्यत असणाऱ्या लॉकडाऊन वाढवला आहे. कल्याण डोंबिवलीत आता १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.

कोरोना रुग्णाचा संसर्ग मोठा प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यासह उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे १७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६ हजार ७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय ५ हजार २९२ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. २ जुलैपासून पुन्हा लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांकडून पालिका प्रशासनाला पाहिजे, तसे सहकार्य मिळाले नाही. यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला. मागील आठ दिवसांमध्ये दरदिवशी शंभरहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले. या कारणाने आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. तर सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयेही रुग्णांनी हाऊसफुल झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शुक्रवारी आढळून आलेल्या रुग्णांची विगतवारी पाहता सर्वाधिक रुग्णांची संख्या कल्याण पश्चिम परिसरात दिसून आली. या परिसरात १९० रुग्ण आढळले. त्याखालोखाल डोंबिवली पूर्व परिसरात १३७ रुग्ण, तर कल्याण पूर्वेत ११३, तर डोंबिवली पश्चिमेत १०५ आणि टिटवाळा - मांडा परिसरात १०, मोहने गावात ४१, पिसवली गावात १० असे एकूण एकाच दिवशी ६०६ नव्या रुग्णांची विक्रमी नोंद झाली. रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीवर आळा बसावा म्हणून पूर्वीच्या नियमावली प्रमाणे १२ ते १९ जुलैपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊन काळात केवळ मेडिकल आणि रुग्णालय सुरु ठेवण्याचे फर्मान पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले आहेत.

हेही वाचा - धक्कादायक; कोविड रुग्णालयातून पळालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा फुटपाथवर मृत्यू, नागरिकांमध्ये संताप

हेही वाचा - ठाणे महापालिकेचा सावळा गोंधळ, एकाच महिलेचे दोन लॅबकडून वेगवेगळे अहवाल

Last Updated : Jul 11, 2020, 8:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.