ETV Bharat / state

कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले...ठाण्यात आतापर्यंत ३३ टक्के रुग्ण बरे

राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ठाणे शहरातील बाधितरुग्णांना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने तत्काळ योग्य उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅब टेस्टींगसाठी वाडिया हॉस्पिटलमध्ये नवीन अत्याधुनिक लॅब सुरू आहे.

Thane Municipal Corporation
Thane Municipal Corporation
author img

By

Published : May 12, 2020, 12:42 PM IST

ठाणे- ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांचा सकारात्मक परिणाम होत आहे. आजपर्यंत जवळपास ३३ टक्के कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. ठाणे महापालिकेच्यावतीने कोविड-१९ घोषित रुग्णालयातील उपचारांच्या सकारात्मक परिणामाने आतापर्यंत एकूण २२४ रुग्ण बरे झाले आहेत.

कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले..

हेही वाचा- चिंताजनक : रायगडच्या उरण तालुक्यात आतापर्यंत 56 कोरोनाबाधित; आज 27 नवीन रुग्ण आढळले

राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ठाणे शहरातील बाधितरुग्णांना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने तत्काळ योग्य उपचार देण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅब टेस्टींगसाठी वाडिया हॉस्पिटलमध्ये नवीन अत्याधुनिक लॅब सुरू आहे. तसेच कोविड-19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय २५० खाटा, कौशल्या रुग्णालय ६० खाटा, होरायझॉन रुग्णालय ६० खाटा, वेदांत रुग्णालय १०० खाटा, कलसेकर रुग्णालयात १०० खाटा, ठाणे हेल्थ केअर रुग्णालयात ५३ खाटा, क्यूरे रुग्णालय, बेथनी रुग्णालय या ठिकाणी नवीन इमारतीमध्ये सध्या एकूण ३४ खाटांची सुविधा कोमॉर्बिड संशयित रुग्णांसाठी उपलब्ध केलेली आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे २० खाटांचा कोमॉर्बिड संशयित आयसोलेशन वॉर्ड निर्माण करण्यात आलेला आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात २५ खाटांची सुविधा कोमॉबिंड संशयित रुग्णांसाठी निर्माण करण्यात आलेली आहे. असे एकूण ७९ खाटा सध्या कोमॉर्बिड संशयित रुग्णासाठी उपलब्ध आहेत. कोव्हिड पॉझिटिव्ह, लक्षणे असणाऱ्या रुग्णांना शहरातील सफायर हॉस्पिटलसह हॉटेल लेरिडा, हॉटेल जिंजर आणि भाईंदरपाडा येथील डी बिल्डींगमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येते आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.