ठाणे- कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक वाढल्याचा प्रकार रुग्णांच्या आकडेवारीने समोर आला आहे. सलग तिसऱ्या दिवशीही महापालिका क्षेत्रात पावणे सहाशे पेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे शुक्रवार(आज) दिवसभरात ५९५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. मात्र शहरातील नागरिकांमध्ये या वाढत्या आकडेवारीचे कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठात खरेदीसाठी अक्षरशः नागरिकांची झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे आहे.
कोरोना रुग्णांची संख्या ६९ हजाराच्यावर
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिवसभरातही ५९५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी ६९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर गेल्या चोवीस तासात २०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हा आहे आतापर्यंतचा मृत्यूचा आकडा
दिवसभरात ५९५ रुग्ण आढळून आल्याने महापालिका क्षेत्रातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या रुग्णांपैकी ४ हजार ३१२ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत ६३ हजार ७९७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. खळबळजनक बाब म्हणजे आतापर्यंत १ हजार १९२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांपैकी कल्याण पूर्वेत ९२ कल्याण पश्चिम १८१, डोंबिवली पूर्व १९०, डोंबिवली पश्चिम ८९, मांडा-टिटवाळा ३७, आणि मोहने भागात ६ रुग्ण असे एकूण ५९५ रुग्ण आढळून आले आहे. तर एकूण रुग्णसंख्या ६९ हजार ३०१ वर पोहचली आहे.
हेही वाचा-महाराष्ट्रातील दुसरी लाट पहिल्या कोरोना लाटेपेक्षा भयानक असणार - डॉ.अविनाश भोंडवे