ETV Bharat / state

Thane Crime News : स्मार्ट सिटी विकासकामे करणारा ठेकेदार निघाला वीजचोर; ३४ लाखांची केली वीजचोरी - ३४ लाखांच्या वीजचोरीचा ठेकेदारावर गुन्हा दाखल

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंंतर्गत कल्याण रेल्वे स्थानक परिसरात विकासाचे काम सुरू ( Contractor Carrying Out Development Work Under Smart City ) आहे. मात्र, या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराने महानगरपालिकेच्या पार्किंगच्या कामासाठी लागणाऱ्या विजेची चोरी ( Stole Electricity Worth 34 Lakhs ) केल्याचे समोर आले आहे.

Contractor Carrying Out Development Work Under Smart City Scheme Stole Electricity Worth 34 Lakhs
स्मार्ट सिटी विकासकामे करणारा ठेकेदार निघाला वीजचोर; ३४ लाखांची केली वीजचोरी
author img

By

Published : Dec 28, 2022, 10:15 PM IST

ठाणे : महावितरणकडून एनसीसीसीएल-किंजल-केटीआयएल ( Contractor Carrying Out Development Work Under Smart City ) कन्सॉर्टियम कंपनी आणि त्याचा पर्यवेक्षक फौज सिंग यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने इतर ठेकेदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत काम करणाऱ्या ( Work Under Smart City Scheme ) ठेकेदाराने पार्किंग बांधकामाकरिता तब्बल 34 लाखांची वीजचोरी ( Stole Electricity Worth 34 Lakhs ) केल्याचे तपासातून समोर आले आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कंपनीला ५०० कोटी रुपयांचा ठेका स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कल्याण डोंबिवली महापलिका क्षेत्रातील हजारो कोटी रुपयांचे विविध विकासकामे सुरू आहेत. त्यापैकी कल्याण रेल्वे स्थानक परिसर विकासाचे काम करण्यासाठी एनसीसीसीएल-किंजल-केटीआयएल कन्सॉर्टियम कंपनीला ५०० कोटी रुपयांचा ठेका दिला आहे. मात्र, या ठेकेदाराकडून याच परिसरात महानगरपालिकेच्या पार्किंगचे बांधकाम सुरू असून या बांधकामासाठी चोरीची वीज वापरल्याचे समोर आले.

बांधकामाच्या कामासाठी फिडर पीलरमधून थेट वीजवापर त्यानंतर महावितरणचे सहायक अभियंता मोहम्मद शेख आणि दक्षता आणि अंमलबजावणी विभागाचे रामचंद्र मासाळे यांच्या पथकाने १९ डिसेंबर रोजी घटनास्थळी पाहणी करून पार्किंगच्य बांधकामाच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. या तपासणीत बांधकामाच्या कामासाठी फिडर पीलरमधून थेट वीजवापर ठेकेदार करीत असल्याचा प्रकार तपासणी दरम्यान उघडकीस आला.

३४ लाख १६ हजार ९६० रुपयांची वीजचोरी खळबळजनक बाब म्हणजे स्मार्ट सिटी विकासकामाचा ठेकेदार गेल्या वर्षभरापासून चोरीच्या विजेचा वापर करत असून जानेवारी ते डिसेंबर २०२२ या कालावधीत ८४ हजार ३७२ युनिट वीज चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ३४ लाख १६ हजार ९६० रुपयांच्या चोरीच्या विजेचे देयक भरण्याची नोटीस कंपनीला बजावण्यात आली. मात्र दिलेल्या मुदतीत या रकमेचा भरणा न झाल्याने सहायक अभियंता मोहम्मद शेख यांनी संबधित कंपनीच्या ठेकेदारावर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात कंपनी तसेच पर्यवेक्षक सिंग यांच्याविरोधात वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरिक्षक सागर चव्हाण करत आहेत.

अशाच प्रकारच्या वीजचोरीच्या अनेक घटना ठाण्यातून समोर भिवंडी तालुक्यातील कोनगाव परिसरात वीजचोरी करणाऱ्या ३७ जणांवर महावितरणच्या वतीने धडक कारवाई केली होती. यात २० लाख २८ हजार रुपये किमतीची वीजचोरी उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकाला यश आले. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार कोनगाव व पिंपळास येथील ३७ जणांविरुद्ध भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.