ETV Bharat / state

ठाण्यात कंटेनर चढला दुभाजकावर; वाहनांच्या लांबच लांब रांगा

कंटेनर फ्लायओव्हरच्या वरून घ्यावा की खालून या दुविधा मनस्थितीत कंटेनर थेट दुभाजकावरच चढला. हा अपघात एवढा भीषण होता की कंटेनरच्या पुढची चाके निखळून बाजूला पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कंटेनरचा भीषण अपघात
author img

By

Published : Sep 20, 2019, 5:28 PM IST

ठाणे - घोडबंदर रोड आता अपघातप्रवीण रस्ता घोषित करायला काहीच हरकत नाही. मोठ्या प्रमाणात येथे अपघात घडतात. त्यात मोठे ट्रक आणि कंटेनरचे अपघात जास्त प्रमाणात होतात. आज देखील असाच एक अपघात पातळीपाड्या जवळ घडला. एक भलामोठा कंटेनर रस्ता दुभाजकावर चढला. पुण्याहून गुजरातला अहमदाबाद येथे कंपनीच्या गाड्या घेऊन सदर कंटेनर जात होता.

कंटेनरचा भीषण अपघात

हेही वाचा- ठाण्यात बसच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

कंटेनर फ्लायओव्हरच्या वरून घ्यावा की खालून या दुविधा मनस्थितीत कंटेनर थेट दुभाजकावरच चढला. हा अपघात एवढा भीषण होता की कंटेनरच्या पुढची चाके निखळून बाजूला पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या अपघाताने आधीच वाहतूक कोंडीने त्रस्त घोडबंदरकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गाड्यांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या.

हेही वाचा- शहापुरात बसची जागीच पलटी, १२ शाळकरी विद्यार्थ्यांसह अनेक प्रवासी जखमी

या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात कायम भीती असते. हा अपघात घडला त्या जागेवर काही दिवसांपूर्वी एका स्कुल बसचा अपघात घडला होता. त्यात विद्यार्थी जखमी झाले होते. ही जागा कायम अपघात होण्यासाठी बदनाम होते. त्यामुळे पोलिसांनी आणि प्रशासनाने या अपघाताची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.

Intro:कंटेनरला भीषण अपघात.. रस्ता दुभाजकावर चढल्याने घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी.. Body:

ठाण्यातील घोडबंदर रोड आता अपघातप्रवीण रस्ता घोषित करायला काहीच हरकत नाहीये एवढे अपघात इथे घडत असतात, त्यातून मोठे ट्रक आणि कंटेनर चे अपघात जास्त प्रमाणात होत आहेत. आज देखील असाच एक अपघात पातळीपाड्या जवळ एक घडला ज्यात एक भलामोठा कंटेनर रस्ता दुभाजकावर चढला. पुण्याहून गुजरात मधील अहमदाबाद येथे महेंद्र कंपनीच्या गाड्या घेऊन सदर कंटेनर चालला होता. आपला कंटेनर फ्लायओव्हर च्या वरून घ्यावा कि खालून या द्विधा मनस्थितीत कंटेनर चालकाने कंटेनर थेट दुभाजकावरच चढवला. हा अपघात एवढा भीषण होता कि कंटेनरच्या पुढची चाके निखळून बाजूला पडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु या अपघाताने आधीच वाहतूक कोंडीने त्रस्त घोडबंदरकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती व गाड्यांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या.
या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या मनात कायम भीती असते हा अपघात घडला त्या जागेवर काही दिवसांपूर्वी एका स्कुल बस चा अपघात घडला होता त्यात विद्यार्थी जखमी झाले होते ही जागा कायम अपघात होण्यासाठी बदनाम होत असते त्यामुळे पोलिसानी आणि प्रशासनाने या अपघाताची गंभीर दखल घेणे गरजेचे आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.