ETV Bharat / state

ठाणेकरांसाठी खूशखबर.. घरबसल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी

नागरिक आपल्या स्मार्ट मोबाईल फोन किंवा लॅपटॉपवरून डॉक्टरांशी संपर्क साधू शकतात. ठाण्यातील तज्ञ डॉक्टरांकडून ही सेवा पूर्णत: मोफत पुरवली जाणार असून इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ठाणेकरांसाठी खूशखबर
ठाणेकरांसाठी खूशखबर
author img

By

Published : Apr 10, 2020, 9:02 PM IST

ठाणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना तत्पर आरोग्यसेवा पुरवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आता शहरातील खासगी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांसाठी स्वतःच्या घरातून थेट व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांशी संपर्क साधून ऑनलाईन तपासणी आणि उपचार करण्याची सुविधा सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारा अशा प्रकारचा भारतातील हा नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. डीजी ठाणे प्रणालीच्या माध्यमातून ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून www.touchbase.live ह्या वेबसाईटवर जाऊन थेट व्हिडिओ कॉल करून नागरिक यादीमधील उपलब्ध तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून घेऊ शकतात.

नागरिक आपल्या स्मार्ट मोबाईल फोन किंवा लॅपटॉपवरून डॉक्टरांशी संपर्क साधू शकतात. ठाण्यातील तज्ञ डॉक्टरांकडून ही सेवा पूर्णत: मोफत पुरवली जाणार असून इंडियन मेडिकल असोसिएशन, ठाणे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

भारतात हा उपक्रम सर्वात प्रथम राबवणारी ठाणे महापालिका प्रथम महापालिका ठरली आहे. सध्या कोविड-19 च्या संसर्गामुळे सर्व शासकीय तसेच महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या मनुष्यबळावर मोठा ताण आला आहे, या नवीन सुविधेमुळे घर बसल्या थेट खासगी क्षेत्रातील डॉक्टरांशी संवाद साधून उपचार करून घेता येणार असल्याने ही सुविधा फारच मोलाची ठरणार आहे.

सध्या या सुविधेंतर्गत सुमारे 40 डॉक्टर्स उपलब्ध झाले असून अजूनही सेवा देण्यासाठी डॉक्टर्स नोंदणी करीत आहेत. ह्या सुविधेमुळे डॉक्टर्स पेशंटला स्क्रीन वर बघू शकतात, त्यांच्याशी संवाद साधू शकतात व कोणती औषधे घ्यायची आहेत, यासाठी ऑनलाईन प्रिस्क्रिपशन देखील देऊ शकतात.

या उपक्रमामुळे सद्यस्थितीत महत्त्वाचे ठरणारे सोशल डिस्टंसिंग राखले जाईल व रुग्णांबरोबरच डॉक्टरांचे आरोग्य देखील सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. 'फाइंड्याबिलिटी सायन्सेस' या कंपनीने ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली आहे. ३० जूनपर्यंत ही सेवा मोफत असून सर्व नागरिकांची याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त डॉक्टरांनी देखील पुढे येऊन या वेबसाईटवर नोंदणी करून दिवसातील किमान १-२ तास ह्या सेवेसाठी द्यावेत, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

कसा कराल वापर?

१.आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप च्या बाऊजर वरून www.touchbase.live/ ह्या वेबसाईटवर 'क्लायंट साइन अप' येथे क्लीक करा.
२.आलेल्या फॉर्मवर आपली संपूर्ण माहिती भरा.
४. संपूर्ण माहिती भरल्यावर तुमचे अकाउंट तयार होईल
५. अकाउंट तयार झाल्यावर 'साइन अप करा'
६. डॅशबोर्डवर उपलब्ध डॉक्टरांच्या यादीतून, तुम्हाला हव्या असलेल्या डॉक्टरांना सिलेक्ट करून कॉल करा.
७. काही क्षणातच तुम्ही डॉक्टरांशी जोडले जाल आणि तुम्ही तुमच्या समस्या डॉक्टरांना विचारू शकाल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.