ETV Bharat / state

OBC Mayor In Thane : ...तर ठाण्यात ओबीसीचा महापौर बसवणार - नाना पटोले - OBC Mayor In Thane nana patole

काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्यास ठाण्यात ओबीसीचा महापौर बसवू, असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले ( Obc Mayor In Thane Nana Patole ) आहे.

Nana Patole
Nana Patole
author img

By

Published : Mar 3, 2022, 8:04 PM IST

ठाणे - आगामी ठाणे महापालिकेसाठी काँग्रेस पक्ष तयारीला लागला ( Thane Corporation Election ) आहे. काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्यास ठाण्यात ओबीसीचा महापौर बसवू, असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले ( Obc Mayor In Thane Nana Patole ) आहे. ठाण्यातील एन.के.टी. सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी संघटनेच्या मेळाव्यात पटोले बोलत होते.

नाना पटोलेंनी यावेळी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, आगामी निवडणूक पाहता काँग्रेसने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. त्यानुसार आम्ही आमची तयारी सुरु केली आहे. नवी मुंबई येथे होणाऱ्या विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, अश्या मागणीचे पत्र माझ्याकडे आले आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सकारात्मक विचार करणार आहे.

भाजपा सर्वात मोठी भ्रष्टाचारी पार्टी

राज्यात सुरु असलेल्या ईडीच्या धाडीबाबात बोलताना नाना पटोले यांनी म्हटले की, ईडीच्या धाडी टाकून सत्तेचा दुरुउपयोग केला जात आहे. ब्लॅकमेलिंग करण्याचे तंत्रज्ञान भाजपाने अवलंबले आहे. भाजपा सर्वात मोठी भ्रष्टाचारी पार्टी आहे. तसेच, भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. यापुढे काँग्रेस असाच आवाज उठवणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले आहे.

नाना पटोले प्रसारमाध्यमांशी बोलताना

युपी इलेक्शन धर्मावर लढण्याचा घाट

हिंदु - मुस्लिम असा वाद निर्माण करून उत्तरप्रदेशची निवडणूक जिंकण्याचा डाव होता, असा आरोप करत, ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - MLA Sanjay Daund Sheershasan : विधिमंडळासमोर राज्यपालांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आमदाराचे शीर्षासन, पाहा VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.