ETV Bharat / state

'त्या' कोविड सेंटरला सुरक्षा पुरविणाऱ्या कंपनीचा ठेका रद्द करा, काँग्रेसची मागणी

भाईंदर पूर्वेकडील कोविड सेंटरमध्ये एका विवाहित महिलेवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती. या कोविड सेंटरला सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी सिक्युरिटीची होती. मात्र, त्याच कंपनीच्या सुरक्षारक्षकाने हा घृणास्पद कृत्य केल्याने या कंपनीचा ठेका रद्द करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

निदर्शने करताना कांँग्रेस कार्यकर्ते
निदर्शने करताना कांँग्रेस कार्यकर्ते
author img

By

Published : Sep 15, 2020, 7:47 PM IST

Updated : Sep 15, 2020, 8:42 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - भाईंदर पूर्वेकडील कोविड सेंटरमध्ये एका विवाहित महिलेवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली होती. यावर शिवसेनेनंतर आज (दि. 15 सप्टें.) काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. यावेळी मीरा भाईंदर काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद सामंत यांनी सत्ताधारी भाजपावर टीका केली. बलात्कार करणारा आरोपी ज्या कंपनीचा सुरक्षा रक्षक आहे, त्याचा ठेका महापालिकेने ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी केली.

बोतलाना काँग्रेस जिल्हाध्यक्ष
भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट परिसरातील कोविड सेंटरमध्ये घडलेल्या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद पाहायला मिळले. काल (दि. 14 सप्टें.) आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित व्यक्ती हा सैनिक सिक्युरिटीचा असून त्याचा ठेका ताबडतोब रद्द करावा, अशी मागणी केली. त्या पाठोपाठ आज (मंगळवार) मीरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. यावेळी कोविड सेंटरमध्ये चाललेला गलथान कारभार सुरू आहे, ज्या ठिकाणी बलात्काराची घटना घडली तिथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, ही मागणी केली आहे.

गेल्या महिन्याभरात शहरात दोन बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. भाजपाचे माजी नगरसेवक यांच्या पुतण्यांना बलात्काराच्या गुन्हात अटक करण्यात आली तर, दुसरीकडे भाईंदर पूर्वेच्या कोविड सेंटरमध्ये एका विवाहितेवर सुरक्षारक्षकाकडून बलात्कार करण्यात आला. यामुळे सत्ताधारी भाजपाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. एका बाजूला भाजपाच्या नगरसेवक यांचे नातलग आरोपी असल्यामुळे भाजपाचे बडे नेते पोलीस ठाण्यात तक्रार दाखल न व्हावी म्हणून बसले होते. तर दुसरीकडे, कोविड सेंटरमध्ये घडलेल्या प्रकरणातील तो सुरक्षा रक्षक ज्या सैनिक सिक्युरिटीमध्ये कामाला आहे, तो ठेका भाजपाच्याच कार्यकर्त्याचा आहे. संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात, यावा अशी मागणी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रमोद सामंत यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्याकडे केली.

हेही वाचा - विशेष : ठाणे जिल्ह्यातील काही भागात 'ऑक्सिजन'चा तुटवडा, रुग्ण दगावण्याची संख्या वाढण्याची भीती

Last Updated : Sep 15, 2020, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.