ETV Bharat / state

ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईची कामे जलदगतीने पूर्ण करा, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश - कोरोना बातमी

ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईची कामे जदल गतिने पूर्ण करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दिल्या आहेत.

ठाणे जिल्हा परिषद
ठाणे जिल्हा परिषद
author img

By

Published : Apr 30, 2020, 11:13 AM IST

ठाणे - कोरोनाच्या संकटाचा लढा सुरु असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण होण्यापूर्वी पाण्याचे टँकर गाव, पाडे, वस्त्यांवर पोहोचायला हवेत. शिवाय ठिकठिकाणी सुरु असणारी टंचाईची कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला दिले. आज त्यांनी दृकश्राव्य माध्यमातून पाणी टंचाई कामांची आढावा बैठक घेतली.

या आढावा बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) तथा कल्याण तालुका संपर्क अधिकारी डी.वाय. जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार (पंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्वच्छता व पाणी पुरवठा) तथा शहापूर संपर्क अधिकारी छायादेवी शिसोदे, शिक्षणाधिकारी तथा भिवंडी तालुका संपर्क अधिकारी संगीता भागवत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) तथा मुरबाड संपर्क अधिकारी संतोष भोसले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी तथा अंबरनाथ तालुका संपर्क अधिकारी डॉ. लक्ष्मण पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेन्घे,कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) एच.एल. भस्मे, गट विकास अधिकारी शहापूर अशोक भवारी, गट विकास अधिकारी मुरबाड रमेश अवचार, गट विकास अधिकारी भिवंडी डॉ. प्रदीप घोरपडे, गट विकास अधिकारी कल्याण श्वेता पालवे, गट विकास अधिकारी अंबरनाथ शीतल कदम आदी अधिकारी यांनी सहभाग घेतला.

एप्रिल-मे महिन्याच्या तीव्र उन्हाळ्यात गावांमध्ये असणारे पाण्याचे विविध स्त्रोत आटल्याने पाणी टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे दरवर्षी टंचाई आराखडा मंजूर करुन त्या माध्यमातून पाणी टंचाई कामे मार्गी लावली जातात. यंदा जरी कोरोनाचे संकट असले तरी जिल्हा परिषदेने योग्य खबरदारी घेत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात टंचाई कामे सुरु केली आहेत.

सध्या शहापूर तालुक्यातील 37 गावे आणि 119 पाड्यांवर 31 टॅंकर पाणी पुरवठा केला जात आहे. तर मुरबाडमध्ये 4 गावे आणि 18 वाड्यांवर पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा एच.एल. भस्मे यांनी दिले. त्याचबरोबर भिवंडी तालुक्यात 81 ठिकाणी विंधन विहिरी (बोरवेल)चे काम सुरु झाले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील यांनी वाफे गावात टंचाई कामांची पाहणी देखील केली.

कोरोनाच्या सध्यस्थितीचा घेतला आढावा
दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी सोनवणे यांनी कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी, शहापूर या पाचही तालुक्यातील कोरोनाची सध्यस्थिती जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून खबरदारीच्या उपायोजना करण्यात येत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेन्घे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागासह इतर सर्व विभाग कार्यरत आहेत. नेमून देण्यात आलेले संपर्क अधिकारी वेळोवेळी तालुक्यांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

हेही वाचा - ठाणेनगर पोलिसांच्या मेहनतीला यश, अद्याप एकही कोरोना रुग्ण नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.