ETV Bharat / state

आदिवासींचा अपमान : अभिनेत्री भारती सिंग विरोधात मुरबाड पोलिसांत तक्रार

मुरबाड पंचायत समितीच्या उपसभापती अरुणा रघुनाथ खाकर यांनी अभिनेत्री भारती सिंगविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कलर्स (HD) चॅनेलवरील शोमध्ये संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून विचित्र अंगविक्षेप करत जातीवाचक अपशब्द वापरत समाजाची चेष्टा केल्याचा आरोप तक्रादारांनी यावेळी केला.

अभिनेत्री भारती सिंग न्यूज
अभिनेत्री भारती सिंग न्यूज
author img

By

Published : Sep 30, 2020, 6:43 PM IST

ठाणे - कलर्स (HD) चॅनेलवरील वरील 'खतरा खतरा' या एका टीव्ही शोमध्ये अभिनेत्री भारती सिंग हिने आदिवासी समाजाला उद्देशून जातीवाचक आक्षेपार्ह वक्तव्य करत गैरकृत्य केल्याविरोधात मुरबाड पंचायत समितीच्या उपसभापती अरुणा रघुनाथ खाकर यांनी अभिनेत्री भारतीविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

अभिनेत्री भारती सिंग विरोधात मुरबाड पोलिसांत तक्रार दाखल

कलर्स (HD) चॅनेलवरील शोमध्ये संपूर्ण आदिवासी समाजाला उद्देशून विचित्र अंगविक्षेप करत जातीवाचक अपशब्द वापरत समाजाची चेष्टा केल्याचा आरोप यावेळी तक्रादारांनी केला आहे. त्यामुळे आदिवासी समाजातर्फे त्यांच्या या कृत्याला आम्ही सर्व आदिवासी समाज म्हणून जाहीर निषेध करीत असून अभिनेत्री भारती सिंग हिच्या या गैरकृत्यामुळे आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट पसरल्याचे पाहवयास मिळत आहे.

हेही वाचा - खासदारांनी ही भाषा बोलणे किती योग्य? उच्च न्यायालयाने संजय राऊतांना खडसावले

आदिवासी समाजाला जातीवाचक अपशब्द बोलून आदिवासी समाजाचा अपमान करणे, जातीवाचक बोलून आदिवासी समाजाच्या भावना दुखावणे असा गैरप्रकार जाणीवपूर्वक केला आहे. त्यामुळे कलर्स (HD) या टीव्हीवरील शो कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, तसेच भारती सिंग व कलर्स चँनेवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार उपसभापती यांनी दिली आहे.

यावेळी आदिवासी लोकसेवा संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ खाकर, मुरबाड कृषी उत्पन्न बाजर समीती संचालक अनिल कवटे, सरपंच भारती शिद, सरपंच नारायण सावळा, सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ उघडे, पांडू शिद उपस्थितीत होते.

हेही वाचा - हल्लेखोरांना अटक करण्यासाठी अलीशा खानचे पोलिसांना आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.