ठाणे : सोमवारी सकाळच्या सुमारास कल्याण-मुरबाड रोडला असलेल्या सेंचुरी कंपनीतून फोन आला. नाग पकडल्याचे कळाले तेव्हा सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी जाऊन खात्री करूण घेतली. अत्यंत घातक अशा कोब्रा नागाला कंपनीतुन सेंचुरीच्या फायरने पकडून आणले होते. नागाला कल्याणच्या वन विभागाकडे देण्यात आले. वन अधिकारी नागाला निर्सगाच्या सानिध्यात सोडणार आहेत. हा नाग इंडियन कोब्रा जातीचा असून ५ फूट लांबीचा आहे.
स्कुलच्या आवारात कोब्रा: दुसरा कोब्रा नाग हा कल्याण पश्चिम भागातील आधारवाडी कारागृहाच्या जवळ असलेल्या डॉन बॉस्को स्कुलच्या आवारात समोवारी दुपारच्या सुमारास स्कुलमधील भूषण नावाच्या कर्मचाऱ्याला दिसला होता. विशेष म्हणजे नुकतीच दुपारच्या जेवणाची सुट्टी होऊन सर्व विध्यार्थ्या वर्गात होते. त्याच सुमाराला हा कोब्रा नाग भक्ष्यच्या शोधात स्कुलच्या आवारात फिरताना दिसला. त्यावेळी तातडीने सर्पमित्र दत्ता यांना संर्पक करून, नाग स्कुलच्या आवारात असल्याची माहिती भूषणने दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता घटनास्थळी दाखल होऊन या कोब्रा नागाला शिताफीने पकडले.
सोसायटीच्या आवारात कोब्रा नाग: तिसरा कोब्रा नाग कल्याण पश्चिम भागातील रोनक सोसायटीच्या आवारात लॉनमध्ये होता. समोवारी दुपारी सोसायटीमधील एक महिला आवारातील लॉनमध्ये फिरत होती. त्यावेळी त्यांना एक लांबलचक कोब्रा नाग दिसला. या नागाला पाहून त्यांनी सोसायटीतील इतर रहिवाशांना नागाची माहिती दिली. नाग सोसायटीच्या लॉन असल्याने सुरक्षा रक्षक या नागावर सर्पमित्र दत्ता येईलपर्यत लक्ष ठेवून होता. काही वेळातच सर्पमित्र दत्ता घाटनस्थळी येऊन त्यांनी या कोब्रा नागाला शिफातीने पकडले. हा कोब्रा नाग सहा फूट लांबीचा आहे.
तिन्ही कोब्रा नागाला निर्सगाच्या सानिध्यात सोडणार: सोमवारी सकाळपासून तीन विषारी साप आढळून आले. यात तिन्ही इंडियन कोब्रा नागाचा समावेश आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. कोणताही साप विषारी असतोच असे नाही. त्यामुळे कुठेही साप आढळून आल्यास त्यांना दुखापत करू नका. तात्काळ प्राणी-सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन दत्ता बोंबे यांनी केले. तर तिन्ही कोब्रा नागाला वन विभागाच्या परवानगीने निर्सगाच्या सानिध्यात सोडणार आल्याची माहिती सर्पमित्र दत्ता यांनी दिली आहे.
कोब्रा नाग टेम्पो चालकाच्या सीटवर : याआधीही विषारी कोब्रा नाग टेम्पो चालकाच्या सीटवर फणा काढून बसल्याचे ठाणे येथे घडले होते. चालकाने त्या नागाला पाहून टेम्पो सोडून धूम ठोकल्याची घटना घडली होती. ही घटना अंबरनाथ एमआयडीसी भागातील एका लादी कारखान्यात घडली होती. अंबरनाथ एमआयडीसी भागातील पेट्रोल पंप शेजारी एक लादी कारखाना आहे. या कारखान्यात मारबलची वाहतूक करण्यासाठी चालक टेम्पो घेऊन आला होता.
हेही वाचा: Snake Dream अशीही अंधश्रद्धा स्वप्नात साप येऊ नये म्हणून चक्क विषारी सापाकडून चावून घेतले