ठाणे : मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पाऊस जोरदार आहे. या जोरदार पावसामुळे रस्त्यांवर खड्डे मोठ्या प्रमाणात झाले आहेत. महामार्गावर वाहतूक कोंडी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे भिवंडी महामार्गावर पाहणी दौरा केला. यावेळी अधिकाऱ्यांना वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले. रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. पावसाळ्यात खड्डे पडल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आवश्यक तेवढे पोलीस कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला : राष्ट्रीय महामार्ग असलेल्या ठाणे भिवंडी महामार्गावर रस्ता रुंदीकरण झालेले नाही. दररोज वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणी नागरिकांचा वेळ, इंधन खर्च होते. यामुळे आता रस्ता रुंदीकरण हातात घेतले आहे. लवकरच त्यासाठी दोन पुल बांधण्यात येणार आहेत. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या घरासमोरील हा महामार्ग दररोज वाहतूक कोंडीत येतो. अनेक रुग्णवाहिका, स्कूल बस दररोज या ठिकाणी अडकून पडतात. आता यासाठी विशेष खबरदारी घेऊन उचित उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अनिल राठोड आणि एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.
उपाययोजना करण्याच्या सूचना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, भिवंडी बायपास नाशिककडून मुंबईला येणारा जो रस्ता आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडींमुळे अनेक दिवसांपासून नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत होते. काही दिवसांपूर्वी खडवलीला एक अपघात झाला, त्यावेळेला सहा लोकांचा मृत्यू झाला. या पाठीमागे वाहतूक कोंडी झाल्याचे कारण आहे. यामधून मार्ग काढण्यासाठी एक बैठक मंत्रालयात झाली होती. त्यात काही उपाययोजना सुचवल्या आहेत. नॅशनल हायवेच्या नियमाप्रमाणे त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले.
महामार्गाची पाहणी : मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, महामार्गावरील क्रॉसिंग काढले, तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. आज जिल्हा अधिकारी, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, एमएमआरटीसीचे अध्यक्ष व इतर अधिकाऱ्यांसह केंद्रीय राज्यमंत्री मंत्री कपिल पाटील व आमदार शांताराम मोरे यांच्या उपस्थित महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. संबधित अधिकारी व ठेकदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा :
- Uddhav Thackeray : एक-एक फोडण्यापेक्षा...; उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान
- Thane Flood : मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षापूर्वी मंजुरीसाठी पत्र दिलेला पूल कागदावरच; झोळी करुन महिलांनी न्यावे लागते रुग्णालयात!
- Car enetered in CM Convoy: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आलिशान कार का घुसविली? जामिन मिळालेल्या आरोपीने सांगितले 'हे' कारण