ठाणे : एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची उभी प्रतिकृती असलेल्या केकची ठाण्यात विशेष मागणी आणि खास मेजवाणीची चर्चा गुरवारपासून रंगली आहे. हा केक कसा दिसतो, हे केक पाहिल्यावरच समजते. गुरुवार सकाळपासूनच राज्यभरातील अनेक लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात येत होते. ९ फेब्रुवारी म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा दिवस समजला जातो. कारण त्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असतो. गुरुवारी मुख्यमंत्री पुन्हा शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा पहिलाच वाढदिवस असल्याने आपल्या नेत्याच्या वाढदिवसासाठी नेते आणि कार्यकर्ते सज्ज झाले होते.
मुख्यमंत्र्यांची एक विशेष प्रतिकृती : केकवर लावण्यासाठी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत विराजमान झालेली मुख्यमंत्र्यांची एक विशेष प्रतिकृती बनवून घेण्यात आली. ठाण्यातील स्वीट काऊंटी या दुकानाने ऑर्डरप्रमाणे ही प्रतिकृती बनवली होती. ज्यांना गरज पडेल त्यांनी ती न्यावी, असे आवाहन त्यांनी केले होते. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला असंख्य कार्यकर्ते नेते आणि नागरिकांनी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. याचा आपल्याला आनंद तर आहेच, परंतु त्याहीपेक्षा अनेक समाज उपयोगी प्रकल्पांचा आपण लोकार्पण केल्याचा आनंद जास्त असल्याचे मनोगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. गुरुवारी सामान्य नागरिकांसाठी गोरगरिबांसाठी आणि दिव्यांगांसाठी अनेक योजनांचे घोषणा केल्या. तसेच आपला आनंद द्विगुणित झाल्याचे मनोगत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.
हुबेहूब दिसणाऱ्या केकमुळे मागणी जास्त : केक बनवण्यासाठी घेतलेल्या विशेष मेहनतीमुळे हा केक एकनाथ शिंदे यांची हुबेहूब आकृती वाटत होता. म्हणूनच या केकची मागणी देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वाढली. पुढील वर्षी अशाच प्रकारे वेगवेगळ्या आकारातील प्रतिकृती बनवण्यात येईल, असे यावेळी व्यावसायिकांनी सांगितले आहे. ठाण्यातील बाळासाहेबांची शिवसेना स्वा. सावरकर नगर आयोजित आगळ्यावेगळा उपक्रम गुरूवारी हाती घेण्यात आला होता.
९ रुपयात या ९ खाद्यांचा आस्वाद : यंदा प्रथमच एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर वाढदिवस जल्लोषात करण्यात आला. या निमित्ताने बाळासाहेबांच्या शिवसेना सावरकर नगर विभागाच्या वतीने ९ फेब्रुवारी अवचित्य साधून सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत ९००० खवय्यांसाठी आवडीचे ९ पदार्थ ठेवण्यात आले होते. यामध्ये कांदा पोहे, उपमा, शिरा, समोसा, वडापाव, उपवास खिचडी, चहा, लस्सी, पाणीपुरी असे पदार्थ सावरकर नगर, लोकमान्य नगर, इंदिरा नगरमधील अश्या ९ भागातील ९ उपहारगृहात आकर्षक सजावट करून उभारण्यात आले होते. फक्त ९ रुपयात या ९ खाद्यांचा आस्वाद खवय्यांना घेता आला. ९ रुपयात पोटभर खाद्य पदार्थ मिळत असल्याने नागरिकांनी गर्दी केली होती.
नऊ तारीख आमच्यासाठी लकी : या सर्व कार्यक्रमाच्या नियोजनामागे 9 हा आकडा प्रामुख्याने पाहता आला यामागे एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाची तारीख ही नऊ असल्यामुळे या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात झालेल्या सर्व सोयी ह्या राज्यभर जाव्यात अशी भूमिका सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली असून हे उपक्रम हे सर्वसामान्य नागरिकांना आणि गरिबांसाठी खूप आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजक माजी गटनेते दिलीप बारटक्के, शाखाप्रमुख हितेंद्र लोटलीकर यांनी केले होते.