ठाणे: राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कडून ठाणे महापालिका मुख्यालयासमोर "क्लस्टरच गाजर पुन्हा एकदा ,आता तरी जागा हो ठाणेकर" अशी बॅनर लावण्यात आले आहेत. 10 वर्ष सत्ताधारी शिवसेना लोकांना मूर्ख बनवत असल्याचे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम खामकर यांनी टीका केली. तर पुन्हा सत्तेत येण्यासाठी शिवसेना क्लस्टर चे गाजर दाखवत असल्याचे खामकर यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत क्लस्टरच्या मुद्यावरून सत्तेत आली मात्र अद्याप कोणतीही वीट रोवली नाही. गुरुवारी पालकमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको आणि ठाणे महापालिका यामध्ये सामंजस्य करार करत स्वाक्षऱ्या झाल्या होत्या, आणि आता क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला असून क्लस्टर होणार असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला होता, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बॅनर लावून अजून किती वर्षे क्लस्टर च्या मुद्यावरून निवडणूक लढवणार असा सवाल उपस्थित केला.
निवडणुका पूर्वी पुन्हा एकदा क्लस्टरचे " गाजर " ! शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीचे बॅनर - NCP's banner against Shiv Sena
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकतील (Thane Municipal Corporation) सत्ताधारी शिवसेनेने पुन्हा एकदा क्लस्टर चा मुद्दा हाती घेतला आहे. जिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Guardian Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत गुरुवारी सामंजस्य करार करत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, त्यानंतर क्लस्टरचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात आले, सत्ताधाऱ्यांच्या याच खेळीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Youth Congress) वतीने बॅनरबाजी करण्यात आली आहे.