ETV Bharat / state

VIDEO : नव्या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहणाचा ठाणेकरांनी घेतला आनंद - ठाणेकरांनी घेतला चंद्रग्रहणाचा आनंद

खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले, की ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते, त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण दिसते.

thane
नव्या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहणाचा ठाणेकरांनी घेतला आनंद
author img

By

Published : Jan 11, 2020, 1:23 PM IST

ठाणे - नवीन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण शुक्रवारी (10 जानेवारी) मध्यरात्री पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री झाले. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून पहायला मिळाले. या चंद्रग्रहणाचा आनंद ठाणेकरांनी घेतला.

नव्या वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहणाचा ठाणेकरांनी घेतला आनंद

हेही वाचा - भिवंडीत कपड्याच्या गोडाऊनला आग, अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले, की ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते, त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण दिसते. शुक्रवारी रात्री 10 वाजून 38 मिनिटांनी चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास प्रारंभ झाला आणि रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी जास्तीत जास्त म्हणजे 89 टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये आले होते. उत्तररात्री म्हणजेच मध्यरात्री 2 वाजून 42 मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडले.

हेही वाचा - नाशवंत शेतमालाच्या वाहतुकीवरील बंदी उठवली

दरम्यान, हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी ही पाहता येण्यासारखे असल्याने ठाणेकरांनी या छायाकल्प चंद्रग्रहणाचा आनंद लुटला. पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी दिसले. हे छायाकल्प चंद्रग्रहण उत्तर अमेरिकेचा उत्तर-पश्चिम भाग, आशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व भाग येथूनही दिसले.

Intro: नूतन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहणBody:

या नूतन वर्षातील पहिले छायाकल्प चंद्रग्रहण काल मध्यरात्री पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री झाले असून ते संपूर्ण भारतातून दिसले. याचा आनंद ठाण्यातही ठाणेकरांनी लूटला... खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी या विषयी अधिक माहिती देताना सांगितले की, ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणार्या विरळ छायेमध्ये येते त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण दिसते. काल शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी रात्री १० वाजून ३८ मिनिटांनी चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये येण्यास प्रारंभ झाली आणि रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी जास्तीत जास्त म्हणजे ८९ टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेमध्ये आले होते.उत्तररात्री म्हणजेच मध्यरात्री २ वाजून ४२ मिनिटांनी वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडले... हे चंद्रग्रहण साध्या डोळ्यांनी ही पाहता येण्या सारखे असल्याने ठाणेकरांनी या छायाकल्प चंद्रग्रहणाचा आनंद लूटला... पौर्णिमा असूनही ग्रहणात चंद्रबिंब कमी तेजस्वी दिसले. हे छायाकल्प चंद्रग्रहण उत्तर अमेरिकेचा उत्तर पश्चिम भाग, आशिया, आॅस्ट्रेलिया, यूरोप आणि दक्षिण अमेरिकेचा पूर्व भाग येथून ही दिसले
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.