ETV Bharat / state

School Girl Molested : शाळकरी मुलीचा विनयभंग; आरोपीला नागरिकांनी दिला बेदम चोप

शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्याला नागरिकांनी बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना ठाण्यात घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (School girl molested) (Thane Crime News)

School Girl Molested
School Girl Molested
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 9:06 PM IST

ठाणे : शेजाऱ्याने सात वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नवीवस्ती परिसरात घडली. खळबळजनक बाब म्हणजे पीडित मुलीलाही आरोपीने बेदम मारहाण देखील केली. तरुणीने आरडाओरडा करताच नागरिकांच्या जमावाने संशयिताला बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. (School girl molested) (Thane Crime News)

संशयितास अटक : याप्रकरणी पोलिसांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून संशयितास अटक केली. इरफान हसीफ शेख (वय 35) असे अटक केलेल्या शेजाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे भिवंडी शहरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन शाळकरी मुलीचे वडील तसेच आरोपी इरफान दोघेही शेजारी राहतात. दरम्यान, पीडित मुलीच्या आई-वडिलांचा इरफानशी काही क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून इरफाननं पीडित मुलीला मारहाण करीत छेड काढल्यानं शाळकरी मुलीचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संशयितास बेदम मारहाण : शुक्रवारी सायंकाळी अल्पवयीन शाळकरी मुलगी घरी परतत असताना संशयिताने तिची छेड काढली. तसेच तिला एका इमारतीजवळ ओढून नेले. या घटनेमुळे पीडित मुलीने रडायला सुरवात केली. तेव्हा आरोपीने तिचा तिचा चेहरा भिंतीवर आदळला. त्यामुळे शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तर दुसरीकडं नागरिकांनी नराधमाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आरोपीला पोलीस कोठडी : ही घटना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी इरफानच्या तावडीतून पीडित मुलीची सुटका केली आहे. जखमी शाळकरी मुलीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती भिवंडी शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत इरफानला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३२३, पोक्सो कलम ८, १२ नुसार गुन्हा दाखल केला. त्याला न्यायालयात हजर केलं असता 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवर करीत आहेत.

हेही वाचा -

  1. Haregaon News : शेळी चोरल्याच्या संशयातून मागासवर्गीय तरुणांना झाडाला उलटं बांधून मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
  2. Burglary In Phaltan : फलटणमध्ये भरवस्तीत घरफोडी, 20 तोळ्याच्या दागिन्यांसह 25 हजाराची रोकड लंपास
  3. Kaushambi Honor Killing : निर्दयी बापासह भावांनी केली हत्या, प्रियकराशी बोलणं बेतलं जिवावर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.