ETV Bharat / state

Child Kidnapping Case Thane : चिमुकल्याचे अपहरण प्रकरण: फॉरेन्सी विभागाच्या तपासाने सर्वच हैराण, जाणून घ्या 'ती' पद्धत

author img

By

Published : Jan 31, 2023, 9:53 PM IST

भिवंडी शहरात कामतघर परिसरातून २६ डिसेंबर रोजी अपहरण झालेल्या दीड वर्षीय चिमुरड्याचा शोध लावण्यात भिवंडी शहर पोलिसांना एक महिन्यांनी यश आले. याप्रकरणी अपहरण करून चिमुरड्याची विक्री करणाऱ्या एक व्यक्तीसह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी अपहरण करणाऱ्या गणेश नरसय्या मेमुल्ला (वय, 38) याला आज (मंगळवारी) या गुन्ह्याचे दोषरोप पत्र न्यायालयात सादर करताना तपासात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेची मदत घेत प्रत्यक्ष घटनास्थळावर मुख्य अपहरणकर्त्याची फ़ॉरेन्सी पथकाकडून चाचणी घेतली आहे.

Child Kidnapping Case Thane
आरोपीची चाचणी
आरोपीची फॉरेन्सी विभागाकडून टेस्ट

ठाणे : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडीतील हनुमान नगर, कामतघर भागात चिमुरडा आई-वडिलांसह राहतो. घटनेच्या दिवशी त्याची आई सुंदरी रामगोपाल गौतम या घरात कपडे धुवत असताना त्यांचा दीड वर्षीय वर्षीय सिद्धांत घराबाहेर खेळत असताना त्याचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चिमुरड्यास एक लाखात विक्री : पोलीस पथकाने नेपाळ सीमेपर्यंत तपास करीत शोध मोहीम सुरू केली. यामध्ये एका मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपास करीत संशयित आरोपी गणेश नरसय्या मेमुल्ला याला कामतघर परिसरातून ताब्यात घेऊन त्याकडे कसून चौकशी केली असता त्याने मूल चोरी करून 1 लाख 5 हजार रुपयांना विक्री केल्याचे कबुल केले. त्यानंतर पोलीस पथकाने भिवंडीतील पद्मानगर नवजीवन कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या आरोपी भारती सुशील शाहु आणि आशा संतोष शाहु या दोघींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून चिमुरड्याची सुखरूप सुटका केली. पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी चिमुरड्यास आई-वडिलांच्या स्वाधीन करून या तिघांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.

मूल नसल्याने चिमुरड्याचे अपहरण ?
आरोपी भारती सुशील शाहु आणि आशा संतोष शाहु या दोघी बहिणी असून आरोपी आशा हिला मूल नसल्याने तिने मूल विकत घेण्याचा निर्णय घेतला. तो तिने बहीण भारतीस बोलून दाखवला. त्यानंतर भारतीची ओळख आरोपी गणेश नरसय्या मेमुल्ला यासोबत असल्याने त्यांनी वर्षभरापूर्वी हा कट रचून चिमुरड्याचे अपहरण करून विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरोपी गणेश मेमुल्ला याने हनुमान नगर परिसरात टेहळणी करून लहान मूल हेरले. त्यामध्ये सिद्धांत हा त्याच्या नजरेत आला आणि त्याने त्याचे अपहरण करून विक्री केल्याचे तपासात उघड झाले.

अपहरण करतानाचा देखावा : दरम्यान, अपहरणकर्त्याचे मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षात त्याच्या शारीरिक हालचाली त्याच आहेत. हे तपासून पाहण्यासाठी त्याची वॉक टेस्ट घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी देत त्यासाठी कलिना मुंबई येथील न्याय वैद्यकीय प्रयोग शाळेतील तज्ज्ञांचे पथक बोलाविले. यानंतर घटनास्थळी अपहरण करतानाचा देखावा उभा करून पाहणी केली आहे.

अपहरकर्त्याच्या कठोर शिक्षेसाठी फॉरेन्सी चाचणी : विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी प्रत्यक्ष गुन्हा करतेवेळी अपहरणकर्ता ज्या ज्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्या कामतघर, हनुमान नगर, पद्मानगर रस्त्यावर आर्ट देखावा आणि पद्मानगर येथील तीन सीसीटीव्हीमध्ये आरोपी चिमुरड्यासह कैद झाला होता. त्या त्या ठिकाणी ही शारीरिक तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये अपहरणकर्ताची चालण्याची पद्धत, मूल कडेवर घेऊन चालतानाची पद्धत तपासली गेली. यामुळे न्यायालयासमोर सबळ पुरावे उपलब्ध करून अपहरकर्त्याला कठोर शिक्षा व्हावी या उद्देशाने प्रत्यक्ष घटनास्थळावर येऊन फ़ॉरेन्सी पथकाकडून चाचणी करून पुरावे गोळा केल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : Pune Koyta Gang : शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर भरदिवसा कोयत्याने हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.