ठाणे : देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याकडून गेले काही महिन्यांपासून महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तूडवण्याचा प्रयत्न ( Insult of Maharashtra by Shinde BJP Govt ) होतोय. हा प्रकार ठरवून सुनियोजनाचा भाग आहे. हे षडयंत्र देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. देवेंद्रजी सभागृहात साधा निंदा जनक प्रस्ताव देखील मांडत नाहीत. अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ( Shiv Sena leader Sushma Andhare ) यांनी केली. त्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याण पूर्वमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेनंतर पत्रकरांशी बोलताना त्यांनी भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यावर सडकून टीका ( Sushma Andhare criticizes BJP and Shinde group ) केली.
राज्यात गलिच्छ राजकारण - महाराष्ट्र पाकिस्तानात नाही कर्नाटक पाकिस्तानच नाही. तरीसुद्धा ते गलिच्छ राजकारण ज्या पद्धतीचे केले जाते त्यामुळे दोन राज्यात वितुष्टवाद वाढतोय. आता राज्यातही तुमची सत्ता केंद्रातही तुमची सत्ता आहे. आमचे एकनाथ भाऊ आम्ही महाराष्ट्र वाचवण्यासाठी निघालो आहोत, असे बोलत होते. महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अपमान होतो. अस्मिता पायदळी तुडवला जाते. गावेच्या गावे ओढली जातात हे सगळं होत असताना मुख्यमंत्री मात्र अगदी गप्प. घर बसलेले असतात कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे राज्याची बाजू मांडतात. एकनाथ भाऊ बाजू मांडण्यासाठी दिल्लीश्वराची परमिशन मिळाली नाही का? कदाचित परमिशन देण्याचे ते वाट पाहतात का असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये - गुजरातच्या निवडणूक सुरू असताना महाराष्ट्राचे उद्योग गुजरात मध्ये स्थलांतरित करायचे. कर्नाटकाच्या निवडणुका तोंडावर आहेत. महाराष्ट्रातले गाव कर्नाटकला जोडण्याचा प्रयत्न करायचा हे फार वाईट आहे. आजपर्यंत भाजपने जाती जातीत भांडत लावत होते. धर्मा धर्मात भांडण लावत होते. आता भाजपा राज्याराज्यात भांडण लावत आहे. हे अत्यंत वाईट आहे. याला कारणीभूत देवेंद्रजींचे फुटीरतावादी राजकारण आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.