ETV Bharat / state

ठाण्यात शिरला बर्डफ्ल्यू; शहरातील चिकन शॉपचा सर्व्हे सुरू - Chicken Shop Survey thane

कोरोनाच्या विषाणू नंतर ठाण्यात ठिकठिकाणी रस्त्यांवर पक्षी मृत अवस्थेत पडत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे शहरात आतापर्यंत एकूण १२१ पक्षांचा मृत्यू झाला असून त्यातील ४ पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूने झाला असल्याचा अहवाल आल्याने ठाणे महापालिका चांगलीच कामाला लागली आहे.

Thane mnc Chicken Shop Survey
चिकन दुकान सर्व्हे ठाणे
author img

By

Published : Jan 12, 2021, 7:39 PM IST

ठाणे - कोरोनाच्या विषाणू नंतर ठाण्यात ठिकठिकाणी रस्त्यांवर पक्षी मृत अवस्थेत पडत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे शहरात आतापर्यंत एकूण १२१ पक्षांचा मृत्यू झाला असून त्यातील ४ पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूने झाला असल्याचा अहवाल आल्याने ठाणे महापालिका चांगलीच कामाला लागली आहे. त्यामुळे, आजपासून शहरातील चिकन शॉपच्या सर्व्हेला सुरुवात झाली असून, सुमारे ६०० हून अधिक चिकन शॉपच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

माहिती देताना ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी

हेही वाचा - उल्हासनगरात कामबंद आंदोलनाचा इशारा देताच सातवा वेतन आयोग लागू

महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना या संदर्भातील जबाबदारी दिली असून, त्यानुसार आजपासून चिकन शॉपमधील कोबंड्यांचा सर्व्हे सुरू झाला आहे. यामध्ये कोबंड्यांना काही आजार आहे का? मृत कोबंड्या कुठे आहेत का? याची पाहणी केली जाणार आहे. तसेच, कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्यास त्यांचे नमुने तपासणी करून शासनाच्या निर्देशानुसार त्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी ठाण्यातील घोडबंदर भागात 16 पक्षांचा मृत्य झाला होता. त्यामध्ये पाण बगळे, पोपट, गिधड आणि त्यानंतर कावळ्यांचा देखील समावेश होता. या मृत पक्षांना तातडीने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी ४ पक्षांना बर्डफ्ल्यू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. या संदर्भात आयुक्त डॉ. शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची तसेच आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. त्यानुसार शहरातील चिकन शॉपचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

500 चिकन शॉपचा सर्व्हे झाला

दुपारपासून शहरातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सर्व्हे करण्याचे काम ९ प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकामार्फत सुरू झाले आहे. आतापर्यंत ५०० चिकन शॉपचा सर्व्हे झाला असून, उर्वरित सर्व्हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. बर्डफ्ल्यूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात सर्व्हे सुरू झाला आहे. आतापर्यंत एकाही कोंबडीचा मृत्य झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, शहरातल्या पाळीव पक्षी पाळणाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून, आजाराची लक्षणे दिसून आली तर लगेच महापालिकेला संपर्क करा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले.

हेही वाचा - फार्महाउसमध्ये भलामोठा अजगर घुसल्याने कुटुंबाची उडाली भंबेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.