ETV Bharat / state

भिंवडीतील केमिकल कारखान्यातील आग आटोक्यात; कारखाना जळून खाक

भिवंडीनजीक असलेल्या खोणी गावातील शेलारमीठ पाडा, येथील आसरा हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका केमिकलच्या कंपनीला शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. तब्बल ५ तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला ही आग विझवण्यात यश आले आहे.

chemical-factory-fire-extinguished-in-bhinwadi-thane
भिंवडीतील केमिकल कारखान्यातील आग आटोक्यात
author img

By

Published : Nov 21, 2020, 8:28 AM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील खोणी गावच्या हद्दीतील एका बंद केमिकल कारखान्याला शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आग लागली होती. या कारखान्यातील साठवलेले केमिकलचे ड्रम्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने स्फोट झाले आणि आगीने रौद्ररुप धारण केले. ५ तासांच्या अथक प्रयत्नानंतर भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आले. या घटनेत कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

भिंवडीतील केमिकल कारखान्यातील आग आटोक्यात

केमीकल साठ्यामुळे आग भडकली
भिवंडीनजीक असलेल्या खोणी गावातील शेलारमीठ पाडा, येथील आसरा हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका केमिकलच्या कंपनीला रात्री साडेआठच्या सुमारास अचानक भीषण आग लागली होती. सुरुवातीला भिवंडी अग्निशमन दलाच्या २ गाड्या आणि ३ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविणायचे प्रयत्न सुरू होते. मात्र, घटनास्थळ दाटीवाटीच्या ठिकाणी असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी गाड्या घेऊन पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. दरम्यान, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच ठाणे, कल्याण डोंबिवली येथूनही अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. तर दुसरीकडे केमीकलमुळे आग अधिकच भडकत होती. या केमिकलच्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फोमचा वापर जवानांना करावा लागला. या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झाली नसल्याचे भिवंडी अग्निमशन दलाच्या कार्यलयातुन सांगण्यात आले. तर या आगीच्या घटनेची नोंद भिवंडी तालुक पोलीस ठाण्यात करण्यात आली असून ही भीषण आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

गेल्या काही महिन्यात मुंबई आणि ठाण्यात लागलेल्या आगी
सेंट्रल मॉलला आग -

मुंबईत आग लागण्याचे सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई सेंट्रल, भायखळा, क्लॉसिक रोड, नागपाडा येथील सिटी सेंट्रल मॉलमध्ये आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवताना धुरामुळे एक जवान जखमी झाला होता. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे तब्बल 250 अधिकारी कर्मचारी प्रयत्न करत होते. यावेळी या मॉलच्या बाजूला असलेली 55 मजली ऑर्किड एन्क्लेव ही इमारत खाली करण्यात आली होती.

दादर बाजार आग -

दादर परिसरातील बाजारपेठेत काही दिवसांपुर्वी भीषण आग लागली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. अग्निशमन विभागाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली होती. या आगीत बाजारातील काही दुकाने जळून खाक झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले होते.

पवईत हॉटेलला भीषण आग -

पवई आयआयटी मार्केट जंक्शन समोर असणाऱ्या एका हॉटेलला भीषण आग लागली होती. यामध्ये हॉटेल पूर्णपणे जळून भस्मसात झाले होते. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती मात्र मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.

कल्याण पश्चिम येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग -

मध्य रेल्वेच्या कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या एका रेल्वे वसाहतीमधील साठवून ठेवलेल्या कचऱ्याला भीषण आग लागली होती. कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन असल्याने स्थानक लगतच्या परिसरात रेल्वे प्रशासनाच्या वसाहती आहेत. अशीच एक वसाहत कल्याण पश्चिम परिसरातील वालधुनीकडे जाणाऱ्या पुला लगतच असलेल्या रेल्वे हायस्कूल समोर आहे. या वसाहतीच्या पुलालगत भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले होते. याच कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवले.

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग -

भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरात भीषण आग लागली होती. या यंत्रमाग कारखान्यात असलेल्या कपड्यांच्या साठ्यामुळे ही आग पसरली होती.

हेही वाचा - कल्याण पश्चिम येथील रेल्वे वसाहतीमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग

हेही वाचा - धारणीत बाजारपेठेला भीषण आग; सुमारे पंधरा दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.