ठाणे - डोंबिवली शहर सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरले होते. एका पंधरा वर्षांच्या अल्पवीयन मुलीवर 33 नराधमांनी सामूहिक बलात्कार ( Dombivli Gang Rape Case ) केल्याची घटना 23 सप्टेंबरला उघडकीस आली होती. राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्याने मानपाडा पोलिसांनी दोषारोपपत्र ( Chargesheet by Manpada Police ) कल्याण जिल्हा न्यायालयात ( Kalyan District Court ) सादर केले आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र 885 पानांचे आहे. तर या गुन्ह्याचा तपास करताना तब्बल 121 साक्षीदारांचे जबाब ( 121 Witness )नोंदवले आहेत.
सर्वच राजकीय पक्षानी केली आरोपींना कठोर शिक्षेची मागणी
या गुन्ह्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 376, 376 (एन), 376 (3), 367 (ड) (अ) सह पोक्सो कायदा कलम 4.6.1 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या घटनेप्रकरणी राज्यातील विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. बलात्कार प्रकरणातील आरोपी सुटता कामा नये, त्यांना कठोर शिक्षा व्हावी, लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती. दरम्यान या गुह्यात 33 आरोपींना अटक करण्यात आली असून यातील चार आरोपी अल्पवयीन असल्याची माहीती दोषारोपपत्रात दिली आहे. पिडीतेवर डोंबिवलीसह बदलापूर, रबाळे, मुरबाड येथे सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्याबाबतचा घटनास्थळी पंचनाम्याचा उल्लेख दोषारोपपत्रात नमूद आहे.
सामूहिक बलात्कारकांडाचे 'असे' घडले धक्कादायक सत्र
पीडित मुलगी डिसेंबरमध्ये एका नातेवाइकाच्या संपर्कात येऊन मुख्य आरोपी असलेल्या तरुणाची भेट घडवून दिली. त्यांनतर सोशल मीडियावरून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर अत्याचार केला. एवढाच नाही तर अत्याचार करतानाचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले होते. याच व्हिडिओच्या आधारे पीडितेवर सुमारे साडे आठ महिने विविध ठिकाणी नेऊन तिला शारिरीक संबंधांसाठी भाग पाडले जात असे. विशेष म्हणजे तिने सुरूवातीला या सगळ्याला नकार दिला. मात्र पीडितेचे विवस्त्र व्हिडिओ तसेच शारिरीक संबंधांचा व्हिडिओही मोबाइलवर शूट करण्यात आला. तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार आरोपीनी अत्याचार केले. असे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात माहिती दिली आहे.
आरोपींचा व्हाट्सअप ग्रुप, हुक्का ओढण्यासही भाग पाडले
ज्या कथित प्रियकराने व्हिडिओ चित्रीकरण केले. त्याने ते इतर मित्रांना पाठवले शिवाय एका व्हाट्सअप ग्रुपही बनवत त्यामध्ये आरोपीना सामील केले. त्यामुळे आरोपींची संख्या वाढत गेले. पहिल्यांदा हा प्रकार घडला तेव्हा पीडितेने सगळ्यांचे नंबर डिलिट केले होते. तिने या अत्याचारी आरोपीना भेटायला नकार दिला. मात्र तिला ब्लॅकमेल करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यावर हे अत्याचारांचे सत्र सुरू झाले. तिला थम्सअप सारखे कोल्डड्रिंक देण्यात आले त्यात पावडर टाकण्यात आली होती. तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. शिवाय अश्लील व्हिडिओ दाखवून हुक्का ओढण्यासही भाग पाडले जात असे. फेब्रुवारी, मार्च, मे या महिन्यांमध्ये हे प्रकार घडले आहेत.
अब्रूची किंमत 500 रुपये
सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने संबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला मित्रांच्या तर स्वाधीन केलेच, शिवाय तिच्या अब्रूची किंमत 500 रुपये लावल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. तिच्यावर आठ ठिकाणी नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. तेव्हा एका ठिकाणी बलात्कार झाल्यावर दोघेजण मुख्य आरोपीला 500 रुपयांच्या दोन नोटा देत होते. तिला जाळ्यात फसविल्यावर तिचा पैसे कमावण्याचे साधन म्हणून आरोपीने वापर केला होता. हे देखील आता पोलीस तपासात उघड झाले आहे. शिवाय काही आरोपींनी तर अत्याचार करतेवेळी काही गडबड होऊ नये, म्हणून कंडोमच्या ठिकाणी प्लस्टिक पिशवीचा वापर केल्याचे उघड झाले आहे.
हेही वाचा - पैशाच्या वादातून खून, पुरावा नष्ट करण्यासाठी खाडीत मृतदेह फेकणार तिघे 'टेलरमार्क'वरून अटकेत