ठाणे - ईडी स्वतःहून कोणाची चौकशी करत नाही. तर त्यांच्याकडे तक्रार आल्यानंतर चौकशी करीत असते. त्यामुळे ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल त्यांना ईडीची भीती वाटेल, तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर, तुम्हाला घाबरायची काय गरज काय..?, असा निशाणा केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ठाकरे सरकारवर साधला. ते भिवंडीतील एकात्मतेचा राजा धामणकर मित्रमंडळ या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रासाठी घातक ठरणारी राज्य सरकारची वृत्ती
महाविकास आघाडी ही अनैसर्गिक सरकार आहे. या राज्य सरकारमध्ये जे काही विपरीत घडेल. ते केंद्र सरकारवर ढकलायचे आणि बाजूला व्हायचे, ही वृत्ती महाराष्ट्रासाठी घातक ठरणारी आहे, असा टोलाही राज्य सरकारला पाटील यांनी लगावला आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी भिवंडीतील धामणकर नाका मित्र मंडळाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनेचा लाभ कशाप्रकारे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत आहे, याची माहिती देत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना योजनेचे वितरण करण्यात आले.
हेही वाचा - वसुलीप्रमाणे ठाकरे सरकारची मानहानीची नोटीसही १०० कोटींचीच, किरीट सोमैयांची खोचक टीका