मीरा भाईंदर - मीरा भाईंदर शहरात हिंदी भाषी भवनाचा ( Hindi Language Bhawan in Mira Bhayandar City ) विषयावरुन चांगलेच राजकारण तापले होते. घोडबंदर सर्व्हे.न.२१/१,२४ पै. या आरक्षित महानगरपालिकेच्या भूखंडावर हिंदी भाषी भवनांचा प्रस्ताव महासभेत सर्वानुमते मंजूर केला होता.
भवनाला कविवर्य हरिवंशराय बच्चन यांचे नाव - त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये हिंदी भाषी भवन कामाची सुरुवात झाली. या भवनाला कविवर्य हरिवंशराय बच्चन ( Harivanshrai Bachchan ) यांचे नाव देण्यात आले.मात्र सुरवाती पासून मराठी एकीकरण समितीने कडकडून विरोध केला गेला. मीरा भाईंदर शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली तर, शुक्रवारी काशीमीरा मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अन्नत्याग बेमुदत आंदोलन सुरू केले. परंतु शनिवारी पालिका, पोलिसांनी आंदोलन उधळून लावले.
हास्य कवी संमेलनाचे आयोजन - रविवारी मिरारोडच्या लता मंगेशकर नाट्यगृहात हिंदी भाषी भवनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी हास्य कवी संमेलनाचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने हिंदी भाषी नागरिक उपस्थित होते. माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनी मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात करत आमदार प्रताप सरनाईक, पालिका आयुक्त दिलीप ढोले यांचे कौतुक केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री स्वतंत्र देव सिंग, माजी मंत्री चंद्रकांत त्रिपाठी, आमदार प्रताप सरनाईक माजी नगरसेवक उपस्थित होते.