ETV Bharat / state

UMC PRO Age Fraud : महापालिकेचा जनसंपर्क अधिकारी निघाला 'श्री ४२०'.. गुन्हा दाखल होताच झाला पसार.. - जन संपर्क अधिकारी

उल्हासनगर महानगरपालिकेच्या ( Ulhasnagar Municipal Corporation ) जनसंपर्क अधिकाऱ्याने ( Public Relation Officer ) जन्मतारखेत फेरफार करून नोकरी मिळवली ( UMC PRO Age Fraud ) आहे. २९ वर्षांनी खरा प्रकार समोर आल्याने त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हा अधिकारी पसार झाला आहे.

महापालिकेचा जनसंपर्क अधिकारी निघाला 'श्री ४२०'.. गुन्हा दाखल होताच झाला पसार..

author img

By

Published : Feb 22, 2022, 4:34 PM IST

ठाणे : उल्हासनगर महापालिकेच्या ( Ulhasnagar Municipal Corporation ) जनसंपर्क अधिकाऱ्याने ( Public Relation Officer ) नोकरीत रुजू होताना जन्मतारखेत फेरफार करून नोकरी मिळविल्याचे तब्बल २९ वर्षाने निष्पन्न झाले. त्यामुळे मध्यवर्ती पोलीस ठाण्यात महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी विविध कलमासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला ( UMC PRO Age Fraud ) आहे. एवढ्या वर्षानंतर गुन्हा दखल झाल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ असून, युवराज भदाणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी अधिकाऱ्याचे नाव आहे.

समाजसेवकामुळे भदाणेचा बोगस कारभार उघड..

गुन्हा दाखल असलेले युवराज भदाणे यांची कारकीर्द कायमच वादग्रस्त राहिली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी बडतर्फीची कारवाई झाल्याने त्या विरोधात न्यायालयात स्थगिती मिळवून महापालिका सेवेत पुन्हा रुजू झाले होते. असे असतांना अनेक वादग्रस्त प्रकारात वादात राहिल्याने त्यांच्यावर अनेकदा निलंबनाची कारवाई झाली. समाजसेवक दिलीप मालवणकर यांनी एका वर्षांपूर्वी भदाणे यांच्या पीएचडी पदवीवर आक्षेप घेऊन जन्मदाखल्याची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे करून उपोषण केले होते. पीएचडी बोगस असल्याचे चौकशीत समोर आल्याने महापालिका आयुक्तांनी भदाणे यांच्या नावासमोरील डॉक्टर पद काढून टाकण्याचे आदेश दिले होते. शिवाय जन्मतारखेचा घोळ असल्याने एक चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीने संपूर्ण प्रकरणी चौकशी करून पालिका प्रशासनाला अहवाल सादर केला होता.

महासभेत गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर..

महापालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने जन्मदाखल्यात फेरफार करून महापालिकेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला आणि महापालकेची २००३ पासून ते आजपावेतो महापालिका प्रशासनाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव (काल) सोमवारी महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला होता. त्याला महासभेने मंजुरी दिली. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अच्युत सासे यांच्या तक्रारीवरून भदाणे यांच्यावर जन्मदाखल्यात फेरफार करून महापालिकेची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला, अशी माहिती महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली आहे.

निलंबनाच्या कारवाईचे संकेत

गुन्हा दाखल होताच भदाणे हे अटक टाळण्यासाठी वैधकीय रजेवर गेल्याचे समोर आले आहे. पोलीस त्यांच्या मागावर असल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे भदाणे पसार झाले आहेत. शिवाय भदाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहे. या गुन्हाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बंडगर करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.