ठाणे: दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून आपल्याला मारण्याचा कट केला जात असल्यासचे खासदार संजय राऊत यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना कळवले होते. या पत्रात म्हटल्याप्रमाणे हा कट खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक कार्यकर्ता असलेल्या राजा ठाकूर यांना सांगितले असल्याचे नमूद केले होते. यामुळेच खासदार श्रीकांत शिंदे यांची नाहक बदनामी केल्याचा आरोप करत ठाण्याच्या कापूरवाडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हा गुन्हा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी नोंदविला आहे.
मिनाक्षी शिंदे यांनी दिली तक्रार: खासदार संजय राऊत यांच्या विरोधात ठाण्याचया कापूरबावडी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. श्रीकांत शिंदे यांच्यावर सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. नंतर संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्या विरोधात माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत कापूरबावडी पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा नोंदवण्यात आला: संजय राऊत यांच्या विरोधात भादवी कलम 211,153(अ),501,504,505(2) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे यांची बदनामी केली, समाजात तेढ, वैमनस्य निर्माण करणे, खोटे पत्र देणे म्हणून तक्रार केली होती. याच अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संजय राऊत बेताल वक्तव्य करीत असून, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते काही ही बडबडत असतात. खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिमा मालिन करण्याचे आक्षेपार्ह विधान करीत आहेत. अशी टीका माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केली आहे. बुधवारी सकाळी ठाणे पोलिसांनी इगतपुरी येथे जाऊन संजय राऊत यांनी दिलेल्या लेखी तक्रारी अर्जावर त्यांचा जबाब नोंदवला.
राजा ठाकूर यांच्या कुटुंबीयांनीही दिली तक्रार: या पत्रामध्ये संजय राऊत यानी नमूद केल्याप्रमाणे राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यानी ही मंगळवारी रात्री लेखी तक्रार कापूर बावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यासोबत आमची बदनामी झाली असल्याचे सांगत न्यायालयात दावा देखील दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच संजय राऊत यांना वेड लागला असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केला होता. त्यांना रोज सकाळी बडबड करण्याची सवय असल्याचा टोला देखील नरेश मस्के यांनी लगावला होता.