ठाणे - एका दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बोटात अडकलेली अंगठी काढण्यासाठी काढण्यासाठी चक्क ग्राइंडरचा वापर करणार्या लेक सिटी रुग्णालयाच्या एका सहायकावर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकार घडल्यानंतर संबधित रुग्णालयाने उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्यानंतर मनसेचे ठाणे शहर सचिव अक्षय करंजवकर पाठपुरावा केला. त्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे. पार्थ सतीश टोपले (वय 14, रा. साई वात्सल्य अपार्टमेंट, पाचपाखाडी, ठाणे) या मुलाच्या उजव्या हाताच्या बोटामध्ये अंगठी अडकली होती. ही अगंठी निघत नसल्याने या मुलाची आई शितल सतीश टोपले यांनी मुलाला दि. 3 जुलै, 2021 रोजी खोपट येथील लेक सिटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले होते. त्यावेळी एकाही वैद्यकीय अधिकार्याने त्या मुलाकडे पाहिले नाही. रुग्णालयात उपस्थित असलेल्या कनिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करुन औषधे देऊन मुलाला घरी पाठविले.
त्यानंतर याच रुग्णालयातील स्वप्नील होतकर याने फोन शितल टोपले यांना आला. मी लेक सिटी रुग्णालयातून बोलत असून रुग्णालय व्यवस्थापनाने मुलाच्या बोटातील अंगठी काढण्यासाठी मला पाठविले आहे, स्वप्नीलने शितल यांना सांगितले. शितल टोपले यांनी समंती दिल्यानंतर स्वप्नील होतकर हा शितल टोपले यांच्या घरी आला आणि त्याने आपल्याकडील ग्राइंडरचा वापर करुन अंगठी काढण्याचा प्रयत्न केला. अंगठी निघत नसल्याने त्याचे पार्थ याचे बोटच कापून काढले. या प्रकारानंतर पार्थची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला लेक सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार देत हातावर तसेच पोटावर शस्त्रक्रिया केले. तुटलेले बोट सुमारे महिनाभर पोटामध्ये ठेवून आता ते त्याच्या हाताला जोडण्यात आले आहे. त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले असून या प्रकारामुळे पार्थ याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
उपचारासाठी लाखोंचे बिल
लेक सिटी रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे पार्थ या अवघ्या 14 वर्षाच्या मुलाच्या हाताला गँग्रीन होण्याचा धोका निर्माण झाला असतानाही उपचाराच्या नावाखाली त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. ही बााब टोपले कुटुंबियांनी अक्षय करंजवकर यांना सांगितल्यानंतर त्यांनी शनिवारी (दि. 14 ऑगस्ट) नौपाडा पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला होता. या इशार्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी लेक सिटी रुग्णालयाचा परवाना रद्द करावा; अन्यथा, आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही करंजवकर यांनी दिला आहे.
हेही वाचा - खड्ड्यांच्या 'राज'कारणावरून मनसे आक्रमक, टोलवरी वसुली कायमस्वरूपी बंद पडण्याचा दिला इशारा