ETV Bharat / state

भरधाव कार झाडाला धडकल्याने चालक अभियंत्याचा मृत्यू; रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने प्राण गमावल्याचा नातेवाईंचा आरोप - भरधाव वेग कार अपघात ठाणे

ठाणे,पश्चिमेकडील पाचपाखाडी भक्ती मंदिर परिसरात राहणारा कल्पेश रविवारी जेवण आटोपल्यावर कार घेऊन फेरफटका मारण्यासाठी गेला होता. यानंतर तो रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तीनहात नाका उड्डाणपुलावरून सर्विस रोड मार्गे पुन्हा घराकडे परतत होता. यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पदपथावरील लोखंडी बॅरिकेड तोडुन कार थेट झाडाला धडकली.

car hit on tree engineer died  in thane
भरधाव कार झाडाला धडकल्याने चालक अभियंत्याचा मृत्यू
author img

By

Published : Jul 7, 2020, 12:13 PM IST

ठाणे - भरधाव कार झाडाला धडकुन कारचालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी रात्री तीनहात नाका सर्विस रोडवर घडली. कल्पेश गायकवाड (वय - 26, रा. भक्तीमंदिर रोड, पाचपाखाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील शिवाजी गायकवाड हे शासकिय ठेकेदार आहेत. याप्रकरणी, नौपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली.

अपघातानंतर घटनास्थळी सुमारे तासभर रुग्णवाहिका पोहचु न शकल्याने उपचाराअभावी जखमी तरूणाला जीव गमवावा लागल्याचा आरोप मृताच्या नातलगांनी केला आहे.

ठाणे,पश्चिमेकडील पाचपाखाडी भक्ती मंदिर परिसरात राहणारा कल्पेश रविवारी जेवण आटोपल्यावर कार घेऊन फेरफटका मारण्यासाठी गेला होता. यानंतर तो रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तीनहात नाका उड्डाणपुलावरून सर्विस रोड मार्गे पुन्हा घराकडे परतत होता. यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि पदपथावरील लोखंडी बॅरिकेड तोडुन कार थेट झाडाला धडकली. यात कल्पेश गंभीररित्या जखमी झाला. मात्र, सरकारी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचे इंजनचे तुकडे झाले.

कोरोनामुळे रुग्णवाहिका उपलब्ध नाही. अनेक गर्भवती महिलांना रस्त्यावरच प्रसुती करावी लागली. या आणि इतर अपघातातही वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे लागलीच सरकारने रुग्णवाहिका उपलब्ध कराव्यात आणि रस्त्यांची दुर्दशा असेल तेथे फलक लावण्याची मागणी नागरिक करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.