ठाणे : गुन्हेगारांवर करडी नजर ठेवत गुन्ह्यांच्या प्रतिबंध आणि तपासासाठी सध्या सीसीटीव्ही कॅमेरे हे पोलीस दलाचे एक हुकमी शस्त्र मानले जाते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे महत्त्व ओळखूनच ठाणे महापालिका आणि खाजगी आस्थापनांच्या माध्यमातून ठाणे शहरातील विविध ठिकाणी जवळपास अडीच हजार कॅमेरे लावण्यात येणार आहेत. अशी माहिती ठाणे शहर पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील यांनी दिली. एक कॅमेरा शहरासाठी या मोहिमेअंतर्गत दुकानदारांना आणि सोसायटी धारकांना बाहेरच्या बाजूला एक कॅमेरा बसवण्याचा आव्हान करण्यात आले. तर त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून जवळपास 100 कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.
गुन्हेगारांची वाढती संख्या : वाढत्या लोकसंख्येमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न सध्या उभा राहिला आहे. गुन्हेगारांची वाढती संख्या आणि गुन्ह्यांच्या वाढत्या घटना पाहता त्यावर आळा घालण्यासाठी ठाणे शहर पोलीस दलामार्फत एक सर्वे करण्यात आला होता. या सर्व अंतर्गत अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट समोर आले होते. अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे समोर आहे. शहरातील अशी ठिकाणे ओळखून त्या ठिकाणी कॅमेरे लावण्याचे मोहीम ठाणे महापालिका तसेच पोलीस दलामार्फत घेण्यात आली.
एकून 100 कॅमेरे लावले : एक कॅमेरा शहरासाठी ही मोहीम ठाण्यापासून सुरू झाली. या मोहिमेअंतर्गत शहरातील इमारती आणि दुकानदारांना कॅमेरे बसवण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्याला प्रतिसाद म्हणून आतापर्यंत तब्बल 100 कॅमेरे लावले असून आणखी 700 ते 800 कॅमेरा लागण्याची शक्यता असल्याचे पाटील यांनी सांगितले. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील लावण्यात आलेले केवळ ६० टक्केच कॅमेरे तांत्रिक किंवा शहरात सुरू असलेल्या कामांमुळे कार्यान्वित असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता ठाणे महापालिका आणि पोलिसांनी हाती घेतलेले या मोहिमेमुळे अनेक गुन्हे उघडकिस येण्यास मदत मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
मनसे झालीय आक्रमक : मागील काही दिवसांमध्ये शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरांमध्ये वाढलेले गुन्हे हे पोलिसांना डोकेदुखी ठरू लागले आहेत. शहरात आधी लावलेले कॅमेरे हे बंद आहेत, त्यांची देखभाल योग्य रीतीने करण्यात येत नाही. त्यामुळे पोलिसांना असे गुन्हेगारांना पकडणे कठीण जाते. तसेच पंधरा दिवसात जर यावर पालिका प्रशासनाने कारवाई केली नाही तर मनसेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देखील अविनाश जाधव यांनी दिला आहे.
हेही वाचा -
- Delhi Crime : व्यावसायिकाची बंदुकीच्या धाकावर लूट; मुख्यमंत्री केजरीवालांनी राज्यपालांचा मागितला राजीनामा
- House Burglar : 8 तोळे सोने चोरणाऱ्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी 80 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले; पण...
- Attack On Businessman Office दोन कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला घटना सीसीटीव्हीत कैद