ETV Bharat / state

मुलुंड-ऐरोली रस्त्यावर बसचा अपघात.. वाहतूक कोंडीत अडकले एकनाथ शिंदे - एकनाथ शिंदे बातमी ठाणे

मुलुंड-ऐरोली ब्रीज जवळ कोकण तडका हॉटेल समोर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ठाणे स्वारगेट बसचा काल (शुक्रवारी) रात्री साडे दहाच्या दरम्यान ब्रेक फेल झाल्याने बस पलटी झाली. या अपघातात 9 प्रवासी गंभीर जखमी व उर्वरीत किरकोळ जखमी झाले आहेत.

bus-accident-on-mulund-arole-road-in-thane
मुलुंड-ऐरोली रस्त्यावर बसचा अपघात..
author img

By

Published : Feb 29, 2020, 7:29 AM IST

नवी मुंबई- शहरातील मुलुंड-ऐरोली रस्त्यावर ठाणे-स्वारगेट बसचा ब्रेक फेल झाल्याने पलटी झाली. यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा फटका ठाण्याचे पालक मंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही बसला. त्यांना 1 तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले होते.

हेही वाचा- निर्भया प्रकरण : दोषी पवन कुमार गुप्ताने दाखल केली 'क्युरेटिव' याचिका

मुलुंड-ऐरोली ब्रीज जवळ कोकण तडका हॉटेल समोर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ठाणे स्वारगेट बसचा काल (शुक्रवारी) रात्री साडे दहाच्या दरम्यान ब्रेक फेल झाल्याने बस पलटी झाली. या अपघातात 9 प्रवासी गंभीर जखमी व उर्वरीत किरकोळ जखमी झाले आहेत. प्रवाशांना जवळपास असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

अपघात झाल्याचे कळताच रबाळे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी लगेच घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेमुळे ऐरोली पासून मुलुंड पर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत एकनाथ शिंदे यांची गाडीही 1 तासापासून अडकली होती. अखेर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रस्ता रिकामा केला व शिंदे यांची गाडी पुढे काढण्यात आली. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या व इतर गाड्या रस्त्यावर वाहतूक कोंडीत अडकून पडल्या होत्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.