ETV Bharat / state

भुरट्या चोरांनी मारला खाद्य तेलाच्या डब्ब्यासह दुधांच्या कॅरेटवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद - Theft of a carat of milk

उल्हासनगर शहरातील दोन वेगवेगळ्या भागातील किरणा दुकान व दूध विक्री केंद्रातून खाद्य तेलासह दुधाचा कॅरेट चोरट्यानी लंपास केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे भुरट्या चोरट्यांनी उल्हासनगर शहरात धुमाकूळ घालून पोलिसांची झोप उडवली आहे.

burglars stole carat of milk along with can of edible oil; Incident captured on CCTV
भुरट्या चोरांनी मारला खाद्य तेलाच्या डब्ब्यासह दुधांच्या कॅरेटवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद
author img

By

Published : Oct 3, 2021, 9:24 PM IST

ठाणे - खाद्य तेलांसह दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत दिवसेंदिवस भाववाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना घरगाडा चालवले महागाईच्या काळात मुश्किल झाले आहे. त्यातच चोरट्यांनी आता महागड्या जीवनावश्यक वस्तू डल्ला मारत असल्याच्या घटनासमोर येत आहे. उल्हासनगर शहरातील दोन वेगवेगळ्या भागातील किरणा दुकान व दूध विक्री केंद्रातून खाद्य तेलासह दुधाचा कॅरेट चोरट्यानी लंपास केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे भुरट्या चोरट्यांनी उल्हासनगर शहरात धुमाकूळ घालून पोलिसांची झोप उडवली आहे.

भुरट्या चोरांनी मारला खाद्य तेलाच्या डब्ब्यासह दुधांच्या कॅरेटवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

दिवसाढवळ्या खाद्य तेलाचा डब्बा रिक्षा टाकून चोरटा पसार -

पहिल्या घटनेत उल्हासनगर ३ नंबर मधील खट्टनमल चौकात असलेल्या किराणा दुकानात घडली आहे. या दुकानाच्या बाहेर खाद्य तेलांचे ८ ते १० डब्बे ठेवण्यात आले होते. त्यातच आज दिवसाढवळ्या दुपारच्या सुमारास एक चोरटा दुकानासमोर घुटमळत असतानाच, त्याने रिक्षाचालकाला दुकानाच्या कोपऱ्यात येण्यास इशारा केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतो. त्यानंतर रिक्षा येताच अचानक दुकानाबाहेर असलेला १५ किलोचा खाद्य तेलाचा डब्बा उचलून चोरटा रिक्षातून धूम ठोकताना सीसीटीव्हीत कैद झाला.

दुधांच्या पिशव्यांचा पूर्ण कॅरेट दुचाकीवरून लंपास -

दुसऱ्या घटनेत उल्हासनगर शहरातील कॅम्प ५ भागात असलेल्या दूध केंद्रातून दुचाकीवरून आलेल्या एका चोराने दुधाचे कॅरेट चोरी करत धूम ठोकल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. जय बाबा धाम परिसरातील योगेश ठाकूर यांचे दुधाची एजन्सी आहे, त्यामुळे पहाटे दुकान बाहेर दुधाचे कॅरेट ठेवले होते. मात्र एक चोरटा दुचाकी वरून आला आणि त्याने त्यातील काही दुधाचे कॅरेट चोरी करत धूम ठोकली. हाच चोरटा दुधाची चोरी करत असल्याने दुकान मालकाने दुकानाबाहेर सीसीटीव्ही लावले. आणि नेमका आज चोरटा चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाला. या प्रकरणी दुकान मालकाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

हेही वाचा - बलात्काराचा आरोपी भोंदू बाबाला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.