ETV Bharat / state

भिवंडीत माजी नगरसेवकाच्या अवैध संपर्क कार्यालयावर पालिकेने फिरवला बुलडोजर

भिवंडी महापालिका क्षेत्रातील सर्वोदय सोसायटीच्या वाहनतळाच्या जागेवर अतिक्रमण करून माजी नगरसेवकाने भव्य कार्यालय उभारले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने या अवैध कार्यालयावर रविवारी बुलडोजर फिरवून कार्यालय उद्ध्वस्त केले.

भिवंडीत माजी नगरसेवकाच्या अवैध संपर्क कार्यालयावर पालिकेने फिरवला बुलडोजर
author img

By

Published : Nov 3, 2019, 7:40 PM IST

ठाणे - भिवंडी महापालिका क्षेत्रातील सर्वोदय सोसायटीच्या वाहनतळाच्या जागेवर अतिक्रमण करून माजी नगरसेवकाने भव्य कार्यालय उभारले होते. त्यानुसार या गैरप्रकाराबाबात न्यायालयात खटला लढला गेला आणि न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने या अवैध कार्यालयावर रविवारी बुलडोजर फिरवून कार्यालय उद्ध्वस्त केले.

हेही वाचा - भिवंडीत दोघा भावांना विवस्त्र केल्याचे चित्रीकरण, चौघांना अटक

महेश कृष्णा जगताप असे अवैध कार्यालय उद्ध्वस्त केलेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. जगताप हे २०११ मध्ये कासार आळी येथील सर्वोदय नागरी सोसायटीच्या वाहनतळाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून भव्य असे संपर्क कार्यालय उभारले होते. या अवैध कार्यालयाविरोधात सोसायटीचे अध्यक्ष विनोद गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये न्यायालयाने संबंधीत अवैध बांधकाम तोडून सोसायटीची जागा मोकळी करून देण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची दखल घेऊन पालिका आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर यांनी प्रशासनाला अवैध कार्यालयाचे बांधकाम तत्काळ बाजूला करण्याचे निर्देश दिले होते.

सहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे, बाळाराम जाधव, शमीम अंसारी, सुदाम जाधव, सुनिल भोईर आदींनी अतिक्रण पथक कर्मचारी व बुलडोजर मशीनच्या सहाय्याने कारवाई केली. अवैध कार्यालयाचे बांधकाम हटवले. यावेळी घटनास्थळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिकेच्या खासगी सुरक्षा यंत्रणेचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा - ठाण्यात युवकांचा अनोखा उपक्रम, किल्ल्यांच्या संवर्धनाने दिवाळी साजरी

Intro:kit 319Body:माजी नगरसेवकाच्या अवैध कार्यालयावर पालिकेचा बुलडोजर

ठाणे :- भिवंडी महापालिका क्षेत्रातील कासार आळी येथील सर्वोदय सोसायटीच्या पार्किंग जागेवर अतिक्रमण करून माजी अपक्ष नगरसेवकाने भव्य कार्यालय उभारले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशाने पालिका प्रशासनाने या अवैध कार्यालयावर रविवारी बुलडोजर फिरवून कार्यालय उध्वस्थ केले आहे.

महेश कृष्णा जगताप असे अवैध कार्यालय उध्वस्थ केलेल्या माजी नगरसेवकाचे नांव आहे. जगताप सन २०११ मध्ये कासारआळी येथील सर्वोदय नागरी सोसायटीच्या पार्कींच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून २८ x ३५ या मोजमापाचे भव्य असे संपर्क कार्यालय उभारले होते. या अवैध कार्यालयाविरोधात सोसायटीचे अध्यक्ष विनोद गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये न्यायालयाने सदरचे अवैध बांधकाम तोडून सोसायटीची जागा मोकळी करून देण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची दखल घेऊन पालिका आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांनी प्रशासनाला अवैध कार्यालयाचे बांधकाम तात्काळ निष्कासित करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानूसार सहाय्यक आयुक्त सोमनाथ सोष्टे ,बाळाराम जाधव ,शमीम अंसारी ,सुदाम जाधव ,सुनिल भोईर आदींनी अतिक्रण पथक कर्मचारी व बुलडोजर मशीनच्या सहाय्याने कारवाई करून अवैध कार्यालयाचे बांधकाम निष्कासित केले आहे. यावेळी घटनास्थळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिकेच्या खाजगी सुरक्षा यंत्रणेचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Conclusion:bhivwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.